धाराशिव – समय सारथी..
कळंबमध्ये हत्या झालेल्या त्या महिलेचं संतोष देशमुख हत्याप्रकरणाशी संबंध नसल्याचे पोलीस तपासात उघड झाले असुन अनैतिक संबंधातुन महिलेची हत्या करण्यात आली आहे. धाराशिव पोलिसांनी कळंब पोलिसात 2 जणा विरुद्ध गुन्हा नोंद केला आहे, बीड जिल्ह्यातील केज येथील रामेश्वर भोसले व उस्मान सय्यद अशी आरोपींची नावे असुन पोलिसांनी उस्मान सय्यद याला अटक केली आहे, दुसऱ्या आरोपीचा पोलीस शोध घेत आहेत. मनीषा कारभारी- बिडवे,मनीषा आकुसकर, मनीषा बियाणी, मनीषा उपाडे, मनीषा गोंदवले अशी वेगवेगळी या महिलेची नावे असुन पुरुषांना जाळ्यात ओढून क्लिप काढुन ही महिला ब्लॅकमेल करायची व बलात्काराचा गुन्हा नोंद करायची अशी चर्चा आहे.
कळंब शहरातील द्वारका नगरी वसाहतीत गुरुवारी मनीषा कारभारी-बिडवे या महिलेचं तिच्याच घरात सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. तिच्या मृत्यूबाबत वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. त्याचबरोबर या मृत महिलेची मस्साजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणी चौकशी झाली होती, अशी देखील चर्चा होती मात्र अनैतिक संबंधाचे कारण समोर आले आहे. मयत महिला खासगी सावकारकी देखील करत असल्याची देखील माहिती मिळतेय, तिने अनेकांना बलात्काराच्या गुन्ह्यात गोवून, अनैतिक संबंध ठेवुन ब्लॅकमेल केल्याचे बोलले जात आहे. तिने 4-5 जणांवर वेगवेगळे गुन्हे नोंद केले असल्याचे कळते.