पिताश्रीच मंत्री असल्याचा आणि आपण धाराशिवचे मालक असल्याचा अहिर्भाव संपेना – टीका
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या कामावरून शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यात चांगलीच जुपंली आहे. लायकी या शब्दावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करीत पाटील कुटुंबाचा आजवर केलेल्या निवडणुकीतील पराभवाचा पट मांडला.
निवडणूक आल्यावरच नव्हे तर 5 वर्ष प्रामाणिकपणे मी लोकांची कामे करतो कारण जनता दर 5 वर्षांनी लायकी दाखवत असते. पण अजूनही तुमचे पिताश्रीच मंत्री असल्याचा आणि आपण धाराशिवचे मालक असल्याचा अहिर्भाव संपत नाही. म्हणून तुमचा पैशाचा माज उतरवणारा आणि जनतेच्या मनात तुमची काय लायकी आहे हा दाखवणारा फोटो पोस्ट करत आहे. हा फोटो बघून एवढंच सांगेल, ही तुमची लायकी असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पोस्ट केले आहे.
2009 च्या विधानसभा निवडणुकीत धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघात, 2019 ला धाराशिव लोकसभा निवडणुकीत राणाजगजीतसिंह पाटील तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ओमराजे यांनी अर्चनाताई पाटील यांचा पराभव केला, 2014 ची विधानसभा सोडता प्रत्येक निवडणुकीत जेव्हा जेव्हा पाटील निंबाळकर आमने सामने आले तेव्हा पाटील परिवार पराभूत झाला याची आकडेवारी ओमराजे यांनी पोस्ट करीत ही तुमची लायकी अशी टीका केली आहे.












