हो मी अधिकाऱ्यांना फोन केला होता, रिल्सवर डॉनबाजी – खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांची पत्रकार परिषदेत
जनता माज उतरवेल, सिंचन प्रकल्पाची मांडली स्तिथी – तरतुदीपेक्षा निधी कमी मिळाला हे महायुतीचे अपयश
धाराशिव – समय सारथी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना उदघाटन्या रोग झाला असुन विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पिता पुत्रांनी आत्मचिंतन करावे असर म्हणत ओमराजे यांनी हल्लाबोल केला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी रेल्वे भुसंपादनात शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली असा आरोप त्यांनी केला. सिंदफळ कार्यक्रम प्रकरणी मी अधिकाऱ्यांना फोन केला होता अशी कबुली त्यांनी दिली. तिथे पळ काढुन यायचे व रिल्सवर डॉनबाजी करायची याला जनता उत्तर देईल असे ओमराजे म्हणाले. लोकसभेला जशी जागा दाखवली तशी विधानसभा निवडणुकीत जनता त्यांना दाखवून देईल, त्यांचा माज उतरवेल असे ते म्हणाले. खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्यात त्यांनी अनेक आरोप केले.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाची स्तिथी मांडली, या प्रकल्पाला तरतुदीपेक्षा निधी कमी मिळाला हे महायुतीचे अपयश असल्याचे आमदार कैलास पाटील म्हणाले. प्रसाद योजनेच्या बक्कळ गप्पा मारल्या मात्र निधी आला नाही. कौडगाव, मोगली येरंड, इटलीचा सोलर प्रकल्प अशी अनेक स्वप्ने दाखवली मात्र एकही पुर्ण झाला नाही, असा आरोप ओमराजे यांनी केला. तुळजापुरच्याहत्ती वेळी शाम जाधव उपस्थितीत होते.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना उदघाट्न्या रोग झाला असुन तो निवडणुक झाला की होतो आणि तो भयंकर रोग आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारकडे रेल्वे विभाग हा कधी हस्तातरीत केला हे मी केंद्र सरकारला विचारणार आहे. रेल्वेसाठी राणाजगजीतसिंह पाटील यांनी कधी बैठक घेतली नाही, भुसंपादनवेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवली. थेट खरेदीने भुसंपादन करू अशी प्रेसनोट त्यांनी काढली व शेतकऱ्यांची दिशाभूल केली, लोकांना फसविले हेच जर स्वतःची जमीन असती तर अशी भुमिका राणा यांनी घेतली असती का असा सवाल ओमराजे यांनी केला.
तुळजापूरकरांना कुत्रा म्हणुन हिनवायचे, आमदार पाटील यांना कशाचा माज आहे हा ? लायकी नसताना त्यांना तुळजापूरकरानी 5 वर्ष सत्तेत बसविले मात्र हे कुत्रा म्हणुन बोलतात त्यामुळेच त्यांच्या बुद्धीची कीव येते मात्र लोक हा माज जिरवतात, आमदार पाटील यांना तुळजापूर मतदार संघ ही स्वतःची जहागीर वाटत होती मात्र लोकसभेला तिथे मला 55 हजार लीड मिळाली त्यामुळे त्यांनी कामाचे आत्मपरीक्षण करावे. हे दुर्दैव आहे लोकांना ते कमी लेखतात असे ओमराजे म्हणाले.
सिंदफळ येथे गोंधळ झाला, तिथे काही न बोलता, शेपूट घालुन वापस यायचे आणि नंतर सोशल मीडियावर डॉन असल्याच्या रिल्स तयार करायच्या व डॉनबाजी करीत मिरवायचे हे चुकीचे असुन लोक त्यांना त्यांची जागा दाखवतील असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.आमदार पाटील हे पालकमंत्री व मालकमंत्री असल्यासारखे वागत असतात अजुन त्यांच्या डोक्यातील सत्ता गेली नाही, काम न करता फक्त भूमिपूजन व उदघाटन करायचे ही त्यांची सवय असल्याचे ओमराजे म्हणाले.
सिंदफळ येथील कार्यक्रमापुर्वी मी अधिकारी यांना माहिती घेण्यासाठी फोन केल्याची कबुली खासदार ओमराजे यांनी दिली. हो मी अधिकारी यांना फोन केला होता, मी अधिकारी यांनी विचारले की काम पुर्ण झाले आहे का, वीज आहे का तिथे, भुसंपादन मावेजा मिळाला का असे विचारले तेव्हा अधिकारी यांनी काम झाले नाही असे सांगितले. त्यांना उदघाटन्या रोग झाला आहे त्याचा उपचार करायचा आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
महायुती सरकारने सिंचन निधी प्रकरणी अन्याय केला आहे, अनेक वेळा 21,7, 24 टीएमसी असे वेगवेगळे आकडेवारी सांगितली जाते. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री जयंत पाटील यांनी बैठक घेऊन कामे करण्याचा प्राधान्यक्रम बदलला, पैसा मराठवाड्याचा मात्र कामे पश्चिम महाराष्ट्रमध्ये सुरु होती. एकाच कामाचे अनेकवेळा पुजन करुन श्रेय लाटले जात आहे असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला. पाटील पिता पुत्रांना तेरमध्ये 50-100 रुपयांच्या साड्या वाटून मते मागावी लागतात त्यामुळे त्यांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.जरवर्षी 1 हजार कोटी निधी मिळणे अपेक्षित आहे तो मिळाला तरच हे काम लवकर पुर्ण होऊ शकते असे ते म्हणाले.
महायुती सरकारने कार्यारंभ आदेश द्यायला 8 महिने का लावले याचे उत्तर द्यायला हवे. 840 कोटी तरतूद होती त्यानंतर 500 कोटी तरतूद केली मात्र 1100 कोटी दिल्याचे सांगितले व प्रत्यक्षात 60 कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे हे वास्तव असल्याचे आमदार पाटील म्हणाले. तरतूद व निधी जास्त मिळण्यापेक्षा तो वर्षानुवर्षे कमी झाला आहे. अजुन वेळ गेली नाही आचारसंहिता लागण्यापुर्वी निधी द्यावा अशी मागणी केली.
धरणे धाराशिव जिल्ह्यात आहेत मात्र त्याचा फायदा बॅरेजमुळे इतर जिल्ह्यातील लोकांना जास्त होत आहे. निम्न तेरणा, धनेगाव ही उदाहरणे आहेत. धरणात जे पाणी साचते त्यापेक्षा जास्त पाणी बॅरेजमध्ये साचते, बॅरेज हे सगळे लातुर जिल्ह्यात आहेत मात्र धाराशिव जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे तत्कालीन पाटबंधारे मंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांनी बांधले व नुकसान केले. कोल्हापूरी बंधारेचे रूपांतर बॅरेज मध्ये करण्याचा प्रस्ताव तयार केला होता मात्र त्याचे काय झाले याचे उत्तर महायुती सरकारने द्यावे. विकासावर बोलणाऱ्यांनी यावर बोलवे असे आवाहन केले.
कळंब तालुक्यातील रायगव्हाण प्रकल्प कधी तरी भरतो, त्यात पाणी टाकण्यासाठी प्रस्ताव तयार केला होता मात्र त्याला थंड बस्त्यात टाकले व अन्याय केला. शेतकरी आत्महत्या होत असुन न झालेल्या कामाचे डिजिटल लावुन श्रेय घेण्यापेक्षा निधी आणुन विकास करावा व त्यानंतर उदघाटने करावीत असे ते म्हणाले.