खासदार ओमराजे निंबाळकर यांचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर अनेक आरोप
धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर अनेक आरोप केले आहेत. पाटील यांच्या कथनी व करणीमध्ये फरक असुन ड्रग्ज प्रकरणात ते विधीमंडळात गप्प का? आवाज का उठवला नाही. ड्रग्ज प्रकरणात माझा मुलगा,भाऊ जरी सहभागी असला तरी त्याच्यावर कायदेशीर कारवाई करा असे मी म्हणतो तशी हिम्मत तुम्ही दाखवणार का असा सवाल खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला. लोकसभेत मी स्वतः हा प्रश्न मांडला विधानसभेमध्ये आमदार कैलास पाटील यांनी प्रश्न मांडला, खरंतर त्यांचा तो मतदारसंघ नाही पण तरीसुद्धा एक सामाजिक जाण म्हणुन त्या ठिकाणी तो प्रश्न मांडला. त्यांनी लक्षवेधी केली त्या लक्षवेधीचे उत्तर कशा पद्धतीने पाय फुटून गेले. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे स्वीय सहायक गणेश भातलवंडे यांनी सोशल मीडियावर उत्तर लीक केले, ते त्यांना कोण व का पाठवले ? नेमका कोणाचा दबाव होता हे समोर येणे गरजेचे आहे.

ड्रग्ज प्रकरणाचा छडा लागला पाहिजे असे आमदार राणाजगजीतसिंह पाटील सांगत आहेत मग त्या मंडळीची नैतिक जबाबदारी नव्हती का? विधानसभा चालू असताना त्यांनी सभागृहात आवाज का उठवला नाही. त्या सभागृहात बोलणं कर्तव्य नव्हतं का मग का बोलल गेल नाही, कथनी व करणीमध्ये फरक आहे, असा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थितीत केला. माझं प्रांजळ मत आहे की ह्याच्यात आपण राजकारण न करता जे आरोपी असतील त्यांना अटक करू द्या. माझा भाऊ, मुलगा का असेना, जो यात सहभागी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा लोकांना जेलमध्ये घालायचं काम आपण स्वतःहुन करणे गरजेचे आहे, यातील सहभागी लोक जेलमध्ये जाऊन कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे ओमराजे म्हणाले.
पहिल्या दिवसापासून अतिशय स्पष्ट आणि परखड मत आहे की, ड्रग्स विकणारे ते कोणी का असेना कुणी का असेना अशा लोकांना जेलच्या मध्ये घालायचं काम पोलिसांनी करणं अपेक्षित आहे आणि त्यामध्ये कुठलाही पक्षपात न करता जी लोक आरोपी म्हणून निष्पन्न झालेत त्या लोकांना नेमकं वाचवण्यासाठी कोण अभय देत आहे, त्याचा पर्दाफाश पोलिसांनी करणे गरजेच आहे. सर्वोच्च सभागृहात मी विषय मांडला, केंद्रीय गृहमंत्री अमित शहानांना मी पत्र लिहिल, केंद्रीय नारकोटिक्स ब्युरोचे प्रमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले असेही ते म्हणाले.