मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत 1 लाख शस्त्रक्रिया, मोफत उपचार
मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र मोहिम, 1 लाख शस्त्रक्रिया, मोफत उपचार
धाराशिव – समय सारथी
मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र मोहिमे अंतर्गत 1 लाख शस्त्रक्रियाचा टप्पा पार झाला असुन आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्यामुळे रुग्णांना दृष्टी मिळाली आहे, 1 लाख शस्त्रक्रियेचा संकल्प मंत्री सावंत यांनी केला होता तो पुर्ण झाला आहे. 19 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान मोतीबिंदू मुक्त महाराष्ट्र पंधरवडा राबविण्यात आला मात्र लोकांचा प्रतिसाद व रुग्णांची संख्या यामुळे अभियानाला 9 मार्चपर्यंत मुदतवाढ दिली गेली या काळात शस्त्रक्रिया करण्यात आल्या.
राज्यातील अकोला जिल्ह्यात 1 हजार 489 रुग्ण, अमरावती 2 हजार 353, बुलढाणा 2 हजार 150, वाशीम 948, यवतमाळ 1 हजार 805, छत्रपती संभाजीनगर 3 हजार 280,हिंगोली 725,जालना 1 हजार 864,परभणी 771,कोल्हापूर 3 हजार 523, रत्नागिरी 1 हजार 348, सांगली 3 हजार 163, सिंधुदुर्ग 518,बीड 1 हजार 590, लातूर 2 हजार 128,नांदेड 3 हजार 284, धाराशिव 955, मुंबई 10 हजार 547, पालघर 2 हजार 587, रायगड 1 हजार 512, ठाणे 9 हजार 886, भंडारा 716,चंद्रपूर 2 हजार 373,गडचिरोली 1 हजार 150,गोंदिया 469, नागपूर 5 हजार 756, वर्धा 1 हजार 826, अहमदनगर 4 हजार 965, धुळे 2 हजार 048, जळगाव 2 हजार 631, नंदुरबार 1 हजार 140, नाशिक 5 हजार 586, पूणे 10 हजार 799, सातारा 2 हजार 4 व सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 435 अश्या राज्यातील 1 लाख 324 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली.
डोळ्यातील लेन्स धुसर किंवा पांढरा होणे म्हणजे मोतीबिंदु होय. कोणत्याही प्रकारची वेदना न होता दृष्टी कमी होत जाणे. चशम्याचा नंबर बदलणे. मोतीबिंदूचा वयोमानानुसार दोन्ही डोळ्यावर प्रभाव पडतो. मोतीबिंदूवर कृत्रिम भिंगारोपण हा पर्याय उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयात व मान्यता प्राप्त स्वयंसेवी संस्था रुग्णालयात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रियेसाठी आशा, आरोग्य कर्मचारी व शासकीय रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी यांनी मेहनत घेत रुग्णसेवा केली.
राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी शिणता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत राष्ट्रीय नेत्र ज्योती अभियान राबविण्यात आले यातुन मोतीबिंदु मुक्त महाराष्ट्र करण्याचा प्रयत्नात केला गेला. मोतीबिंदुने गेली दृष्टी, कृत्रिम भिंगारोपणाने पहा सृष्टी असा नारा देत हे अभियान राबविले गेले.