मी इच्छुक – आमदार विक्रम काळे यांची पत्रकार परिषद
धाराशिव – समय सारथी
लोकसभेप्रमाणे विधानसभेत राष्ट्रवादीला आयात उमेदवार देऊ नका, दिला तर तो आम्ही स्वीकारणार नाही व एकही कार्यकर्ता त्यांचे काम करणार नाही असा ठराव पक्ष कार्यकर्ते यांनी केला आहे. मनोज जरांगे पाटील हे विधानसभेला उमेदवार देतील असे त्याच्याशी झालेल्या चर्चेवरून वाटत नाही असा दावा शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी केला. अर्चना पाटील ह्या राष्ट्रवादीतच आहेत पण त्या विधानसभेला इच्छुक नाहीत, त्यांनी तसा दावाही केला नसल्याचे आमदार काळे म्हणाले. ते स्वतः विधानसभा लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगितले.
पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शहराध्यक्ष सचिन तावडे, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष अतुल जगताप, मनोज मुदगल, नंदकुमार गवारे यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
2019 ला धाराशिव कळंब विधानसभा जागा राष्ट्रवादीने लढवली होती त्यावेळी 2 क्रमांकचा पक्ष राहिला होता, तोच निकष लावुन ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला द्यावी अशी मागणी शिक्षक मतदार संघांचे आमदार विक्रम काळे यांनी केली. 2024 लोकसभेला मतदार संघ सुटला होता मात्र बाहेरच्या पक्षातील लोकांना राष्ट्रवादी पक्षात घेऊन उमेदवारी दिली त्याचा फटका बसला व लोकसभेत दारुण पराभव झाला त्यामुळे एकमताने बैठक घेऊन पार्टीतील कार्यकर्ते याला उमेदवारी द्यावी, अन्य पक्षातील कोणी एन वेळी आले तर त्याला उमेदवारी देऊ नये असे ठराव सर्वानुमते झाला असल्याचे आमदार काळे म्हणाले.
माझ्या वडिलांनी व मी पाण्यासाठी लढा दिला, अनेक पाणी परिषदा, बैठक घेतल्या. शेतकरी, शैक्षणिक सामाजिक प्रश्न घेऊन मी मार्गी लावत आहे. उमेदवारी दिल्यास मतदार संघाचा कायापालट करू असे ते म्हणाले. महायुती पदाधिकारी यांना भेटून विनंती केली की कोणालाही जागा सुटली तरी प्रामाणिक काम करुन महायुती उमेदवार निवडुन आणू असे ठरले आहे मात्र आयात उमेदवार आता राष्ट्रवादी पक्ष कार्यकर्ते आता स्वीकारणार नाही असा उमेदवार पक्षाने दिला तर त्याचे काम एकही कार्यकर्ता करणार नाही असा ठराव सर्वांनी घेतल्याचे आमदार काळे म्हणाले.
शिक्षक आमदार असुन 8 जिल्ह्यात मोठा मतदार संघ आहे, रात्र दिवस फिरत आहे तिच ताकत या मतदार संघात दिली तर मी मोठी विकास कामे करुन शकेल असे सांगत त्यांनी स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक असल्याचे सांगितले. मंत्री पदासाठी मी विधानसभा लढवत नसल्याचेही ते म्हणाले.
अर्चना पाटील ह्या अजुन राष्ट्रवादी पक्षात आहेत त्या पक्षाच्या राज्य पातळीवरील बैठकांना हजर राहतात, त्यांनी अजुन तरी राजीनामा दिला नाही त्यामुळे त्या पक्षात आहेत. अर्चना पाटील यांनी पक्षाकडे विधानसभा उमेदवारीची मागणी केली नाही, त्या इच्छुक नाहीत असे आमदार काळे म्हणाले.
मी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली ती राजकीय भेट नव्हती, त्याच्याशी झालेल्या चर्चेनुसार असे वाटत नाही की ते विधानसभा निवडणुकीत उमेदवारी देतील असे काळे म्हणाले. माझ्या पक्षाला उमेदवारी द्या असे म्हणणे योग्य आहे मात्र राष्ट्रवादीला जागा सोडू नका व विक्रम काळे यांना उमेदवारी देऊ नका असे मेसेज इतर महायुतीतील पक्षांनी पाठवणे चुकीचे असुन त्याबाबत पक्षश्रेष्टी यांना कळविले आहे.
विडिओ पहा