धाराशिव – समय सारथी
जनतेने ड्रग्ज पेडलरला तुळजापुरचा नगराध्यक्ष केले. मला वाटतं इथून पुढे तुळजाभवानी मातेचा प्रसाद देण्याऐवजी येणाऱ्या भक्तांना ड्रग्जची पुडी दिली जाईल अशी उपरोधीक टोला आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी लागवला. ड्रग्ज प्रकरणात काही अटीवर जामीनीवर असलेले संशयित आरोपी विनोद उर्फ पिटू भाई गंगणे हे भाजपच्या तिकिटावर निवडून येऊन नगराध्यक्ष झाले आहेत. आमदार सावंत यांनी आमदार पाटील यांना लक्ष्य करीत टीका केली.
तुळजाभवानी शक्तीपीठ आहे, हे सर्वांचं आदराच स्थान असून, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची विटंबना होता कामा नये, ही आमची माफक भूमिका होती. गाभारा वगळून मंदिर परिसरात विकास कामे करणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सर्वसामान्य भक्तांची कुचंबना झाली आहे. भक्त उघडपणे बोलत नाहीत पण आज मी भक्तांच्या वतीने व्यक्त झालो.
माझ्या पक्षाचे जिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख आणि कार्यकर्त्यांची व्यथा आहे की भाजपने आम्हाला फसवले आहे, ती व्यथा मी जाहीरपणे मांडली आहे.भाजपशी युती करायची की नाही, हा निर्णय माझ्या अखत्यारीत येत नाही. याबाबत आमचे नेते आणि पक्षप्रमुख जो आदेश देतील, त्यानुसार काम करू असे सावंत म्हणाले. चर्चेची दार सर्वांसाठी खुली आहेत. केवळ भाजप बरोबर युती होईल असे सांगत नाही ज्याप्रमाणे भूम परंडा येथे शिवसेना विरोधात सर्व पक्ष एकत्र आले. सर्वासाठी चर्चेची दारे खुली असतील असे ते म्हणाले.
आपणं हिंदू आहोत, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र्य आहे, नवरात्र आपण कडक व्रत पाळतो, शिवता शिवत होऊ नये म्हणुन काळजी घेतो मात्र आता कुठली 4 लोक गाभाऱ्यात जात आहेत. भ्रष्टाचार करायचा. आमदार म्हणत आहेत मंदिराचे शुशोभीकरण केले, काय करायचे ते बाहेर विकास करा. गाभाऱ्याला कशाला हात लावता ते पवित्र्य राहणार आहे का? हे शक्तीपीठ आहे, त्याचा आदर पवित्र्य राखले पाहिजे मात्र त्याला ठेचं लागली आहे याची खंत व खेद वाटतो त्यामुळे आत्मचिंतन करायची गरज आहे असे सावंत म्हणाले.
मी पालकमंत्री असताना 2 वर्ष ही फाईल माझ्याकडे प्रलंबित होती त्यावेळी मी सांगितले होते की जें काही करायचे आहे ते करा मात्र गाभाऱ्याला हात लावू नका कारण आमच्या निष्ठेचा प्रश्न आहे. आमच्या देवीचे ते सिंहासन आहे, तिथे शिवता शिवत नको, ते सोडून सगळं मान्य आहे म्हणुन मी सही केली नाही. नवीन सरकार आले तेव्हा भाजपचे मुख्यमंत्री झाले तेव्हा 8 दिवसात मंजुरी घेऊन गुलाल उधळला. पवित्र्य नष्ट करण्याचे पाप केले त्याची फळे त्यांना परमेश्वर देईल असे सावंत म्हणाले.
इतकी विटंबना होणे मान्य नाही, याचे कारण काय ? याचा रागही येतो व तुमचे चेहरे बघितले की त्याचं वाईटही वाटत कारण रझाकाराची ही औलाद तुमच्या छातीवर नाचत असताना आपण गप्प कसे? हा त्यांचा की आपला दोष आहे. असे काय आहे ज्यामुळे त्यांची वेठबिगारी करावी लागते, कोणती गोष्ट आहे त्याचा त्रास होतोय. याच्या सारखे 10 जण जरी आले, कोणतेही संकट आले तरी हा तानाजी सावंत छातीचा कोट करून समोर उभे राहणार असे मी वचन देतो. मी बघतो त्याच्यात किती दम आहे ते असे म्हणत आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना खुले आव्हान दिले.












