धाराशिव – समय सारथी
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी दरम्यान एक वेगळाच किस्सा घडला असुन त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी उशिरा पोहोचलेल्या आमदार प्रवीण स्वामी यांच्यावर विनोदी पण खोचक टोला लगावला.
बैठक सुरु झाल्यानंतर स्वामी उशिरा सभागृहात दाखल झाले. त्यावर पालकमंत्र्यांनी त्यांचे कान टोचले. स्वामी यांना वेळेवर येण्याचं पुस्तकं द्या असे म्हटले. त्यामुळे उपस्थित अधिकारी, आमदार आणि पदाधिकारी यांच्यात एकच हशा पिकला, त्यावेळी आमदार कैलास पाटील यांनी ‘माझं पुस्तकं दिलं’ असे म्हणत नेहमी प्रमाणे सावरून घेतले.
स्वामी हे अनेक शासकीय बैठका व पक्षाच्या पत्रकार परिषद यांना उशीरा येत असतात त्यामुळे त्यांची ओळख ‘लेट लतीफ’ आमदार अशी होऊ लागली आहे. विकास व चर्चासाठी होणाऱ्या नियोजित बैठकीला ते अनेकदा उशिरा येतात. शिक्षक असलेले स्वामी आमदार झाले मात्र त्यांना वेळ काही पाळता येईना.
धाराशिव जिल्ह्यात पुरस्तिथी असताना जनतेला आधार देण्याची गरज असताना ते तुळजाभवानी संस्कृतीक महोत्सवाचे उदघाटन करत पाहुणचार स्वीकारत मग्न होते, त्यावरून बरीच टीका झाली. अतिवृष्टी व नुकसानीच्या शुन्य आकडेवारी बाबतही त्यांना पत्रकार यांना आठवण व जाणीव करून द्यावी लागली.
खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यावर त्यांच्या कारभाराची ‘मदार’ अवलंबून असते, असे अनेकदा दिसते. उमरगा लोहारा मतदार संघातही अशीच काहीशी स्तिथी आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसान भरपाई वाटप कार्यक्रमात त्यांना अधिकाऱ्यांनी बोलावले नाही राजशिष्टाचार पाळला नाही, याबाबत अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली, त्यातही त्यांनी खासदार ओमराजे यांचाच टेकू अर्थात ‘आधार’ घेतला.
जिल्हा प्रशासनात अजूनही त्यांना स्वतःचे आमदार म्हणुन ‘स्थान’ किंवा ‘वजन’ निर्माण करता आले नाही, त्यांना नेहमी ‘टेकू’ ची गरज असल्याने त्यातून त्यांचे ‘कर्तृत्व’ दिसुन येते. स्वामी यांनी ओमराजे यांचा आधार घेऊन राज्यातील विषय प्रतिष्ठेचा करून थेट दिल्ली ‘दरबारी’ नेहून ठेवला आहे. आमदार म्हणुन काम करताना ते अनेकदा गोंधळुन जातात, स्वामी यांचे अनेक रंजक किस्से यानिमित्ताने चर्चले जात आहेत.
अडचणीचे मुद्दे किंवा काही झाले तर ‘हाताची घडी तोंडावर बोट’ या भूमिकेत जाऊन खासदार – आमदार यांच्याकडे बोट दाखवतात त्यामुळे ‘टेकू’ आमदार पेक्षा माजी आमदार ज्ञानराज चौगुले बरे असे मतदार म्हणत आहेत. ते आमदार झाले असते तर आज मंत्री होऊन कामे तरी झाली असती.