मी दिल्लीला गेलो होता, खासदारकी जबाबदारीपासुन पळणारा नाही – ओमराजेंच्या जवळचे लोक संपर्कात
धाराशिव – समय सारथी
सोलापूर तुळजापूर धाराशिव रेल्वे महत्वकाक्षी प्रयोग आहे त्यात काही राजकीय विरोधक हे गावोगावी जाऊन माझ्या विरोधात अपप्रचार करीत आहेत मात्र मावेजा मिळावा यासाठी कोर्टात जाणार आहे. बेस रेट हा कमी असतो तो व्यवहार कमी रकमेचे झाल्याने कमी आहे. बेसरेट कमी असेल तर वाटाघाटीने मिळणारा दर देखील अपेक्षित मिळत नाही.सर्व शेतकरी यांच्यावतीने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. संबंधित अधिकारी वा मंत्रालयात बोललो त्यात बेस रेट ठरवताना विंडो असते त्यात काही बाबी ग्राह्य धरल्या नाहीत त्या विरोधात कोर्टात जाणार. अधिकारी यांनी त्यांच्या चौकटीत निर्णय घेतला आहे त्या विरोधात कोर्टात जाणार असेही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पत्रकार परिषदेला सतीश दंडनाईक,नितीन काळे, राजसिंहराजे निंबाळकर,नेताजी पाटील, सुनील काकडे, प्रवीण पाठक,इंद्रजीत देवकते यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
अर्धवटराव जे आहेत ते पीक विमा असो की इतर विषयात कोर्टात जात नाहीत, चमकोगिरी करतात अशी टीका आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केली. ठाकरे यांच्या काळात राज्य सरकारने रेल्वेचा वाटा न दिल्याने रेल्वे प्रकल्पाला विरोध झाला. एमआयडीसी विषयात त्यांना काही केले नाही, पीक विमामध्ये काही कळत नाही, समोर चार प्रश्न विचारले तर काही बोलता येणार नाही अशी स्तिथी आहे.
5 हजार कोटी रुपयांची कामे झाली नाहीत तरी देखील आमदार राणा यांनी स्वतःचा सत्कार करुन घेतला अशी टीका आमदार कैलास पाटील यांनी केली, आमदार राणा यांनी त्यातील कामे दाखवावी असे आवाहन आमदार कैलास पाटील यांनी केली त्याला उत्तर देताना आमदार म्हणाले की त्यांना समोर बोलवा चर्चा करुन मग कामे दाखवू.
भाजप उमेदवार द्यायला घाबरत आहे अशी टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली होती त्यावर बोलताना आमदार पाटील म्हणाले की हो आम्ही थरथर कापतोय, भाजपचा उमेदवार द्याला असे म्हणत मिश्किल टीका केली.
खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जवळचे काही लोक आहेत जे मला सांगतात ते काय करतात, खासदार यांच्या उजव्या व डाव्या हाताशी जवळ बसणारे लोक आहेत, त्याच्या रेकॉर्डिंग आहेत असे आमदार राणा म्हणाले.
महायुतीचा उमेदवार ओमराजे हे फायनल आहेत का ? असे ते म्हणाले, ओमराजे यांची अजुन उमेदवारी जाहीर झाली नाही आगामी काळात आश्चर्यकारक गोष्टी होतील. काही लोक टीका करतात व नंतर फोनवरून सांगतात की वाईट वाटून घेऊ नका, आम्हाला तसे बोलावे लागते.
आपण कोण आहोत, आपली कुवत काय हे पाहून बोलावे. मेळाव्यात टाळ्या घेण्यासाठी काही जण बोलले ते टिपले गेलेले आहे. जबाबदारीने बोलणे वागणे गरजेचे आहे ज्याला त्याला लखलाभ असा सल्ला त्यांनी दिला.
रवींद्र गायकवाड यांना महायुती मेळाव्यात का बोलु दिले नाही याबाबत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे सांगू शकतील कारण कार्यक्रमाचे नियोजन हे मंत्री सावंत पाहत होते.
बीड लातूर धाराशिव या लोकसभा क्लस्टरची जबाबदारी पक्षाने मला दिली होती त्यासाठी मी दिल्लीला गेलो होतो, मी जबाबदारी पासुन पळणारा माणूस नाही, मी राज्यात की केंद्रात राहणे योग्य आहे याचा निर्णय पक्ष घेईल तो अधिकार मला नाही. पक्ष जो आदेश देईल त्यांचे पालन करील असे आमदार पाटील यांनी सांगितले.