धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असुन भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी व नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बांधावर जात आहेत.आमदार पाटील यांनी दाऊतपुर येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली व धीर दिला.
नुकसानीची दाहकता व वास्तव सरकारला व जनतेला दिसावे यासाठी आमदार पाटील यांनी स्वतः एक फेसबुक लाईव्ह केले. त्यात 3 शेतकरी शेतात साठलेल्या पाण्यात उभे असुन त्यांच्या हातात भिजलेले सोयाबीन आहे आणि आमदार पाटील हे बांधावर उभे राहुन प्रश्न उत्तर करताना त्यांचा आवाज ऐकू येत आहेत. शेतात सगळीकडे पाणीच पाणी असुन त्यावरून भीषण स्तिथी लक्षात येते.
दाऊतपुरला आम्ही आहोत आणि गावाच्या थोड बाहेर तुम्हाला हे तळ वाटत असेल पण ते तळे नसुन शेत आहे त्यात सोयाबीन आहे, शेतकरी यांनी हे सोयाबीन काढून आमदार राणाजागजीसिंह पाटील यांना दाखवले आहे. त्यावेळी शेतकरी यांनी सांगितले की, हे सोयाबिन नासुन गेले आहे. यावरून लक्षात येते की सोयाबीनची काय स्तिथी असेल. ज्या शेतकऱ्याचे हे शेत आहे त्यांनी पीक विमा भरलेला नाही, दुर्दैवाने 30 टक्के शेतकरी यांनी पीक विमा भरला नाही, त्यांचं काय करायचं ते पाहू असे आश्वासन दिले. आमदार पाटील हे शेतकऱ्यांना आपुलकीने प्रश्न उत्तर विचारत त्यांचे दुःख, व्यथा जाणून घेत आधार देताना दिसत आहेत.
दाऊतपूर येथे मुसळधार पावसामुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. याठिकाणी सोयाबीन पीक पाण्याखाली गेलं असून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ऊस देखील गेल्या महिन्याभरापासून पाण्यात असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. शेतकऱ्यांवर ओढवलेलं हे संकट प्रचंड मोठं असून त्यांना योग्य ती मदत मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत असे आमदार पाटील म्हणाले.
व्यस्त कामात व विविध जबाबदारीतुन वेळात वेळ काढून आमदार पाटील शेतकरी व त्यांच्या समस्यांना प्राधान्य देत आहेत. कधी बांधावर, कधी बैठका घेऊन तर कधी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून अश्या विविध आघाड्यावर ते शेतकरी व प्रशासनाशी संपर्क साधुन आहेत. संकटात सापडलेल्या शेतकरी यांच्यासाठी ते आधार ठरत आहेत.
तुळजाभवानी मंदीर संस्थानकडुन 1 कोटी व तेरणा ट्रस्टकडुन 51 लाख असे 1 कोटी 51 लाख मुख्यमंत्री सहायता निधीला देत असल्याची संयुक्त घोषणा त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून केली. तुळजाभवानी व तेरणा ट्रस्टची यात एक वाक्यता व भुमिका यातुन दिसुन आली.