धाराशिव – समय सारथी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने उमेदवारी जाहीर होताच आमदार कैलास पाटील यांनी आभार मानत जनतेची कामे करण्याचा संकल्प व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व महाविकास आघाडीतील नेते, तसेच आपल्या पाठीशी ठामपणे उभे राहिलेले धाराशिव-कळंबचे मतदार बंधू-भगिनी, कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतक यांचे आभार मानले.
गेल्या पाच वर्षांत धाराशिव-कळंब विधानसभा मतदारसंघातील विविध विकासकामे मार्गी लावत धाराशिव-कळंब वासियांचा विश्वास सार्थ ठरवता आला, त्यांच्या या विश्वासाला पात्र राहत आगामी काळातही आपण अतिशय कर्तव्य दक्षतेने आणि प्रामाणिक पणे कार्यरत राहू आणि त्यासाठी धाराशिव-कळंबची जनता नेहमीप्रमाणे या वेळीही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील, हा विश्वास आहे त्यांनी व्यक्त केला.