धाराशिव – समय सारथी
तुळजापूर, परंडासह धाराशिव जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करी प्रकरणात आमदार कैलास पाटील यांनी विधानससभेत लक्षवेधी मांडली होती, ती लक्षवेधी सभागृहात चर्चेला येण्याआधी व सरकारने उत्तर देण्याआधी सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आली आहे. भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे एका स्वीय सहायकाने एका ग्रुपवर पोलीस अधीक्षक यांचे उत्तर व्हायरल केले आहे. या उत्तर ‘लीक’ प्रकरणात सरकारने कारवाईचे आश्वासन दिले आहे. आमदार कैलास पाटील या प्रकरणी आक्रमक झाले असुन त्यांनी हा सगळा प्रकार विधीमंडळात मांडला त्यावेळी सत्ताधारी आमदार यांनी सुद्धा हे प्रकार गंभीर असल्याचे सांगत निषेध केला व कारवाईची मागणी केली त्यानंतर सभापती व मंत्री यांनी आश्वासन दिले
.

आमदार कैलास पाटील विधीमंडळात म्हणाले की, मी एक लक्षवेधी मांडली होती ती सभागृहाची संपत्ती आहे, ती अजुन चर्चेला आली नाही, संबंधित विभागाचे उत्तर मागितले होते मात्र त्यांचे उत्तर सरकारला येण्याआधी तालुक्याच्या ग्रुपवर व्हायरल झाले. सदस्यांना लक्षवेधी प्रश्नाची उत्तरे विधीमंडळात मिळत नाहीत, ती घ्यावी लागतात तिथे उत्तर लीक होते त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. शासनाने याची नोंद घ्यावी असे आदेश तालिका अध्यक्ष दिलीप बनकर यांनी दिले. लक्षवेधी कुठे लीक झाली हे पाहून कारवाई करा असे आदेश दिले. विभागाकडून लक्षवेधी खाली गेली असेल तर त्यावर कारवाई करू असे आश्वासन मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात दिले.