धाराशिव – समय सारथी
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या संकटाच्या काळात माजी मंत्री आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. सावंत यांनी आज प्रशासनाला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले. एकही तालुका, गट, गण किंवा एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना, ते म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलून किती व कशी मदत करायची हे आम्ही ठरवू. आम्ही आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री यांना कळवू. तुम्ही फक्त पंचनामे करण्यावर लक्ष केंद्रित करा, खाली तलाठी, मंडळ अधिकारी पंचनामा करतात का याचा आढावा घ्या असेही ते म्हणाले.