बांधावर जाऊन मदत करा, मी देणारा हात – बोबलत फिरून त्यांचाच चहा पिऊन जाणारी औलाद नाही – विरोधकांना टोला
धाराशिव – समय सारथी
गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं आहे. या संकटाच्या काळात माजी मंत्री आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आहेत. त्यांनी आढावा घेतल्याने प्रशासनासोबतच पदाधिकारी, कार्यकर्ते यांना बळ मिळाले असुन ते कामाला लागले आहेत.
सरकारी यंत्रणासह त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून शेतकऱ्यांना मदत, धीर देण्याचे आदेश दिले आहेत. सरकारची मदत येईल तेव्हा येईल मात्र थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत करा, किती कोटी लागले तरी खर्च होऊ द्या, मी आहे ना काळजी करू नका, शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका असे सावंत म्हणाले. युवासेना तालुका प्रमुख तथा बाजार समितीचे संचालक सरपंच राहुल डोके यांनी सावंत यांना फोन केल्यावर त्यांनी कार्यकर्ते यांना सक्रीय करा असे आदेश दिले. जवळा गावातील रस्ता दुरुस्ती करण्याचे आदेश दिले. तालुका प्रमुख अण्णा जाधव, जिल्हा संघटक गौतम लटके यांच्यासह अन्य पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी गावोगावी जात आढावा घेतला.
नुसतं यायचं बोंबलत फिरायचं, विचारायचं तुमच्या शेतात, नदीत, पिकात पाणी गेले आहे का? आणि त्यांचाच चहा प्यायचा आणि गुपचूप निघून जायचं ही माझी औलाद नाही. मी थेट मदत करणारा आहे असे म्हणत त्यांनी विरोधकांना नाव न घेता टोला लागवला. तब्येतील मुळे मला येता येत नाही, मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो तरी जनतेला काय लागते ते उपलब्ध करून देईल, मी देणारा हात आहे. असे ते कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधताना म्हणाले.
निवडणुकीपुरते काम न करता आताही तसेच करा, मतदार संघात जे रस्ते खराब झाले आहेत ते सर्व करा, सरकार पैसे देईल किंवा नाही देईल, आपल्या हातात आहे ते करा. मागील वेळी राहिलेले व जे खराब झाले आहेत ते रस्ते कामे पाऊस कमी झाला की पुर्ण करा. गट, गण निहाय कामे करा, कार्यकर्ते यांना सक्रीय करा, 10 कोटी लागले तरी चालेल असे ते म्हणाले.
सावंत यांनी आज प्रशासनाला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे तात्काळ करण्याचे आदेश तहसीलदार यांना दिले. एकही तालुका, गट, गण किंवा एकही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी बोलताना, ते म्हणाले की, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलून किती व कशी मदत करायची हे आम्ही ठरवू. आम्ही आमच्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या भावना मुख्यमंत्री यांना कळवू. तुम्ही फक्त पंचनामे करण्यावर लक्ष केंद्रित करा, खाली तलाठी, मंडळ अधिकारी पंचनामा करतात का याचा आढावा घ्या असेही ते म्हणाले.
शेतकरी नाराज आहेत का हे शेतकरी यांना विचारा, तब्येत नीट नसल्याने त्यांना येता येत नाही. त्यांनी यायची गरज नाही, सगळी कामे इथे ते पुर्ण करतात. 15 वर्ष ते आमदार होते त्यांनी कधी अर्धा किलोमीटर रस्ता पुर्ण केला का याचे उत्तर द्यावे असे आव्हान डोके यांनी दिले.