धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे नेतृत्व पुन्हा एकदा सिद्ध झाले असुन ते महायुतीसाठी संकटमोचन ठरले आहेत. देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवानंद रोचकरी व अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत यांनी महायुतीला पाठिंबा देत अर्चना पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन केले आहे. रोचकरी यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेल्यानंतर तुळजापूर येथे धाकधूक वाढली होती मात्र मंत्री सावंत यांनी रोचकरी यांना महायुतीत सहभागी करुन घेतले. मंत्री सावंत यांनी एकप्रकारे उद्धव ठाकरे यांचा डाव उधळून लावला.
मंत्री सावंत यांनी तुळजापूर येथे अनेक विकास कामे केली व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले असे सांगत देवराज मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवानंद रोचकरी यांनी आपल्या शेकडो समर्थकासह सोनारी येथील भैरवनाथ साखर कारखाना स्थळी पालकमंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महायुतीच्या लोकसभेच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. देवराज मित्र मंडळाच्या माध्यमातून अर्चनाताई पाटील यांना तुळजापूर तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर मताधिक्य देण्याचा निर्धार व्यक्त केला. रोचकरी यांना मानणारा मोठा गट तुळजापूरमध्ये असुन देवराज मित्र मंडळाच्या अनेक शाखा आहेत, रोचकरी यांनी यापुर्वी 4 वेळेस लोकसभा निवडणुक लढविली आहे.
अपक्ष उमेदवार काकासाहेब खोत यांनी सोनारिस्थित भैरवनाथ कारखाना स्थळी पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत, आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या उपास्थितीत महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांना जाहीर पाठींबा दर्शवित मोठ्या मताधिक्क्याने निवडूण देण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.