बार्शी – समय सारथी
पालकमंत्री तानाजीराव सावंत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टीका केली आहे. माझा बाप मारला, माझा बाप मारला असं भावनिक वातावरण ओमराजे निर्माण करतील. माझा बाप मारला काय हे ? 2009 ते आजवर 15 वर्ष झाली, मराठी भाषेत सांगायचं झाल तर मडपीक आपण एकदाच घेतो. मड पीक 15 -15 वर्ष असते का ? म्हातारा झाला तरी मड पीकावरच जगायचं, ही कुठली पद्धत आहे. ज्यावेळी भावनेच्या आहरी जाऊन लोकांनी 2009 ला आमदार केले त्याचं जनतेने 2014 ला घरी बसवले.माझा बाप मारला असे म्हणत आहेस त्यात मतदारसंघातील लोकांचे बाप मारायला निघाला आहेस का ? असा प्रश्न मंत्री तानाजीराव सावंत यांनी उपस्थितीत केला. ते महायुतीच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारार्थ सभेत बोलत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार राजेंद्र राऊत, अर्चना पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.
परिस्थितीच भान असणे आणि कुठे तरी भावनिक होऊन व समोरच्या व्यक्तीला भावनिक करुन मतदान घेणे हा याच्यात दोन उमेदवार यातील फरक आज या व्यासपीठावर दिसला आहे. विकास विकासाच्या पद्धतीने चालतो भावना भावनेच्या पद्धतीने चालतो. आम्ही कडवट शिवसैनिक आहोत आणि राहणार आहोत. कडवट शिवसैनिक कधीही कोणत्याही सत्तेपुढे व अमिषापुढे झुकलेला नाही, झुकणार नाही.
2019 ला तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी माझ्या हातात धागा बांधून मला सांगितले की तानाजीराव धाराशिवचा खासदार तुम्ही निवडून आणायचा आहे. तुम्ही सांगेल तो उमेदवार, तुम्ही बांधलं ते तोरण असे म्हणाले, त्यामुळे आम्ही ओमराजे यांना विकासासाठी व मोदी यांच्यासाठी निवडून आणले. यावेळी त्यांनी ओमराजे यांचा उल्लेख माजी खासदार करीत टीका केली.
एक रुपयाचा विकास केला नाही किंवा पावती नाही, ना मदत नाही. भंगारविक्या अशी ओळख असलेल्या खासदार ओमराजे निंबाळकर यांना पराभूत करा असे आवाहन केले. भावनेच्या आहरी जाणारा हा मतदार संघ नाही.
महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे काम धाराशिव मधून झाले. याला साक्षीदार देवेंद्र फडणवीस आहेत. संतनाथ साखर कारखाना 6 महिन्यात चालू करू शकतो, तो चालू करण्यापासून कोणाचा बाप आपल्याला अडवू शकत नाही. तेरणा साखर कारखाना सुरु करताना सह्याद्रीप्रमाणे माझ्या मागे उभे राहिले ते म्हणजे देवेंद्र फडणवीस असे मंत्री सावंत म्हणाले.
बार्शीची ओळख तमाशाचा फड, गजरा लावण्याची ओळख पुसून आता विकासाची बार्शी अशी ओळख झाली आहे. मराठवाडा वाटरग्रीड योजना महाविकास आघाडीने बंद केली मात्र 2022 ला सत्तेत आल्यावर आम्ही ती योजना पुन्हा सुरु केली. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हंटले तर तो त्यांचा अपमान ठरेलं कारण ते विश्वगुरू आहेत.
2024 साली धाराशिवचा लोकप्रतिनिधी हा मोदी साहेबांच्या विचाराचा द्यावा लागेल. पश्चिम महाराष्ट्र प्रमाणे मराठवाडा करायचा असेल तर अर्चना पाटील यांनी भाषण करताना सर्व मुद्दे मांडल्याबद्दल अभिनंदन केले व त्यांना निवडून द्या असे आवाहन मंत्री तानाजीराव सावंत यांनी दिले.