अधिकाराचा वापर करणार – जिल्हा नियोजन समिती निधीचा वादावर पालकमंत्री प्रतापराव सरनाईक
धाराशिव – समय सारथी
स्थगिती उठल्याचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयातुन जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त झाले आहे, मध्यंतरीच्या काळात काही प्रमाणात वाद विवाद निर्माण झाले होते, राजकीय पक्षामध्ये ही चढाओढ होत असते. मी मुख्यमंत्री यांना विनंती केली होती त्याला मान देऊन त्यांनी स्थगिती उठवली आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी काही तक्रारी केल्या होत्या त्यांना काही संशय व शंका होती ती आता दुर झाली आहे, त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणात नागरिकांसाठी व कामासाठी खर्च करता येणार आहे. स्थगिती उठली असली तरी त्यात अनेक त्रुटी आहेत, त्याची पूर्तता लवकरात लवकर केली जाईल.
मी तर या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणुन नवीनच आलो होतो, इथल्या कुरघोडीच्या राजकारणाची कल्पना नव्हती. पालकमंत्री या नात्याने सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन काम करायला हवे, मी ते प्रामाणिकपणे करीत आहे त्यामुळे स्थगिती उठावी यासाठी प्रयत्न केले. आपआपसातील कुरघोड्या कितीही असल्या तरी त्या थांबणार नाहीत. सर्वसामान्य नागरिक मात्र यात होरपळणार नाही याची मी पालकमंत्री म्हणुन काळजी घेईल.
स्थगिती उठवताना गरज असल्यास 2024-25 ची कामे 2025-26 मध्ये घ्यावी असे नमुद केले आहे. गरज व निकष कोण ठरवणार यावर पालकमंत्री म्हणाले की, अध्यक्ष म्हणुन माझ्याकडे काही अधिकार व निर्णय असताना त्याचा वापर योग्य वेळी केला जाईल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या अधिकाराचा वापर करू असे म्हणत त्यांनी कोणाचीही मनमानी चालणार नाही याचे सूचक संकेत दिले.