धाराशिव – समय सारथी
राज्यात शिवसेना एकनाथ शिंदे गट पुन्हा एकदा ऑपरेशन टायगर राबविणार असुन याची जबाबदारी सर्व 12 मंत्र्यावर देण्यात आली आहे, धाराशिव जिल्ह्यावर पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष लक्ष असल्याचे विधान परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांनी केले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कैलास पाटील व उमरगा येथून प्रवीण स्वामी हे दोन आमदार आहेत. मागील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ठाकरे गटाच्या आमदार यांच्याशी पालकमंत्री यांची जवळीक पहायला मिळाली तर धाराशिव जिल्ह्यात सुद्धा काही बदल झाला तर आपणाला वेगळं वावग वाटायला नको असे पालकमंत्री म्हणाले. आम्ही त्याला तडा जाऊ देणार नाही. आम्ही एकनिष्ठ असुन संघर्ष करणार उलट तेचं अस्वस्थ आहेत. सत्ता नसली म्हणुन आम्ही पक्ष बदलणार नाही. संघर्ष करुन लोकहोताची कामे करू मात्र पक्ष सोडणार नाही अशी भुमिका खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी स्पष्ट केली आहे.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत, उद्धव ठाकरे यांच्या गटाने 96 उमेदवार उभे केले, त्यापैकी 20 उमेदवार विजयी झाले. 2024 च्या निवडणुकीत, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे) या दोन गटांमध्ये थेट लढती झाल्या. 51 मतदारसंघांमध्ये झालेल्या या लढतींमध्ये उद्धव ठाकरे यांच्या गटाने 12 जागांवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या गटाने 37 जागांवर विजय मिळवला. 2022 मध्ये पक्ष फुटीवेळी शिवसेनाचे 55 पैकी तब्ब्ल 40 आमदार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले तर 15आमदार उद्धव ठाकरे सोबत राहिले. 18 पैकी 13 खासदार हे एकनाथ शिंदे सोबत गेले त्यात कैलास पाटील होते तर 5 खासदार हे उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिले त्यात ओम राजेनिंबाळकर होते.
उद्धव ठाकरे यांच्या गटात 20 आमदार असुन मेहकर येथून सिद्धार्थ खरात,दर्यापूर मतदार संघातुन गजानन लवाटे, बाळापूर नितीन देशमुख, वणी संजय देरकर,परभणी राहुल पाटील,विक्रोळी सुनील राऊत,जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर,दिंडोशी सुनील प्रभू,वर्सोवा हरुन खान,कलिना संजय पोतनीस,वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई,माहीम महेश सावंत,वरळी आदित्य ठाकरे,शिवडी अजय चौधरी,भायखळा मनोज जामसुतकर,खेड आळंदी बाबाजी काळे,उमरगा प्रवीण स्वामी, धाराशिव कैलास पाटील, बार्शी दिलीप सोपल, गुहागर येथून भास्कर जाधव हे आमदार आहेत.