आरोग्याचा कायदा, उद्योग, रोजगार, बँक, दुध संघ पुनर्जिवीत करणार – मंत्री डॉ तानाजीराव सावंत
भुम – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याने गेली 30 ते 40 वर्ष कधीही विकासाचे पर्व पाहिले नव्हते, ते दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे, त्या कामात मी खारीचा वाटा उचलला आहे. गेल्या 5 वर्षात आमदार व त्यानंतर मंत्री म्हणुन या मतदार संघात विकासाचे पर्व सुरु केले. लोकशाहीचा उत्सव आहे, लोकांना मतांचा अधिकार घटनेने दिला आहे तो बजावायचा दिवस आलेला आहे. मतदार सुज्ञ आहेत, विकास झाला आहे त्यांची पोहच पावती 20 नोव्हेंबरला मतदार मतपेटीतुन देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विजयाची एक लाख टक्के खात्री असुन धाराशिव कळंब विधानसभा मतदार संघाच्या उमेदवारी बाबत आज निर्णय होईल व धनुष्यबाण विजयी होईल असा विश्वास मंत्री डॉ सावंत यांनी व्यक्त केला. सावंत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार यांच्याशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी विकासाचा रोड मॅप सांगितला.
गेली 30-40 वर्षात येथील जनतेच्या मुलभुत गरजा पुर्ण झालेल्या नव्हत्या, गेल्या अडीच तीन वर्षात त्या गरजा पुर्ण करण्याचे उपक्रम हाती घेतले, काम केले. आता त्या गरजा पुर्ण झाल्या असुन खवा क्लस्टर, धुळीस गेलेला दुध संघ, बँक पून्हा उभी करायची आहे. टेक्स्टईल उद्योग, 3 एमआयडीसी मंजुर केल्या असुन त्या सुरु करुन स्थानिक तरुणांना उद्योग व बेरोजगार तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. स्थानिक उद्योजक उभा करुन त्याला आधार द्याची संकल्पना असुन ती प्रत्यक्षात उतरवीणार असल्याचा मनोदय डॉ सावंत यांनी व्यक्त केला.
सरकारने गेल्या दोन अडीच वर्षात अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत, त्याचा शेतकरी यांच्या बांधापर्यंत व माता भगिनी यांना लाभ झाला आहे. आगपाखड करणे हे विरोधकांचे काम असुन आम्ही त्याला फारशी किंमत देत नाहीत. 23 तारखेला महायुती सरकार सत्तेत येऊन गुलाल उधळेल असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विजयाचा निर्धार केला. जे निर्णय घेतले त्यांची अंमलबजावणी केली.
आरोग्य खाते माझ्याकडे असल्यामुळे मतदार संघात अनेक कामे झाली त्याचं बरोबर आरोग्य खात्यात गेल्या 40-50 वर्षात जे निर्णय झाले नाहीत ते घेतले, न भुतो न भविष्यती असे निर्णय घेऊन कायापालट केला आहे. नागरिकांना आरोग्याचा अधिकार हा कायदा (राईट टू हेल्थ) कायदा करायचा आहे, आचारसंहिता असल्यामुळे एक निर्णय घ्यायचा राहिला असुन तो घेणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे भारताची अर्थव्यवस्था साडे पाच बिलीयनची करायची असुन महाराष्ट्र त्यात हातभार लावेल. आरोग्य सुदृढ असेल तरच काम चांगले होऊ शकेल.
गुढीपाडव्यापर्यंत हक्काचे पाणी येणार असुन साठवण तलावाच्याद्वारे ते शेतकऱ्यांना दिले जाईल. प्रत्येक शेतकरी याच्या शेतात पाणी पोहचवले जाईल, उपसा जलसिंचन सहकारी संस्था सुरु करणे व त्यांना बँकेमार्फत अर्थसहाय्य करणार असुन भुम परंडा वाशी मतदार संघात पाणी आल्यापासुन पुढील 5 वर्षाचे वीज बील हे भैरवनाथ शुगर वर्क्सच्या माध्यमातुन दिले जाईल असे डॉ सावंत म्हणाले.