धाराशिव – समय सारथी
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा.
डॉ तानाजीराव सावंत हे 25 व 26 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
गुरुवार, 25 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता कात्रज पुणे येथून मोटारीने जिल्ह्यातील मौजे परंडाकडे प्रयाण. सकाळी 11.30 मौजे परंडा येथे आगमन व पंचायत समिती परंडा येथे सायकल वाटप व शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता मौजे परंडा येथून मौजे यशवंत नगर ता.भूमकडे रवाना. दुपारी 1.00 वाजता मौजे यशवंत नगर येथे आगमन व श्री संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 2.00 वाजता मौजे यशवंत नगर येथून मौजे हासेगाव ता.कळंबकडे रवाना. दुपारी 3.10 वाजता मौजे हासेगांव ता. कळंब येथे आगमन व RMC प्लांटचे उद्घाटन. दुपारी 3.40 वाजता मौजे हासेगाव येथून भैरवनाथ शुगर वर्क्स लि.ढोकीकडे रवाना. दुपारी 4.20 वाजता भैरवनाथ शुगर वर्क्स लि.ढोकी येथे आगमन व राखीव तसेच सोयीनुसार भैरवनाथ शुगर वर्क्स लि.ढोकी येथून शिंगोली शासकीय विश्रामगृह धाराशिव कडे रवाना व शासकीय विश्रामगृह धाराशिव येथे मुक्काम करतील
शुक्रवार 26 जानेवारी रोजी सकाळी 9.05 वाजता शिंगोली शासकीय विश्रामगृह धाराशिव येथून पोलिस मुख्यालय धाराशिव कडे रवाना. सकाळी 9.15 वाजता पोलिस मुख्यालय धाराशिव येथे आगमन व भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहनाचा मुख्य शासकीय समारंभास उपस्थिती. सकाळी 10.30 वाजता पोलिस मुख्यालय धाराशिव येथून जिल्हा विधीज्ञ मंडळ धाराशिव यांच्या न्यायालयामध्ये ई-फायलिंग सेवा केंद्राच्या उद्घाटनास उपस्थिती. सकाळी 10.50 वाजता बसस्थानक धाराशिव येथे भूमिपूजनास उपस्थिती. सकाळी 11.20 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथील कॅथ लॅबचे भूमिपूजन. सकाळी 11.40 वाजता जिल्हा ग्रंथालय धाराशिव नूतन इमारतीचे लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.10 वाजता जिजाऊ चौक, बार्शी नाका धाराशिव येथे दैनिक आरंभ मराठी प्रकाशन सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 12.30 वाजता मौजे धाराशिव येथून मौजे तुळजापूरकडे रवाना. दुपारी 1.00 वाजता मौजे तुळजापूर येथे आगमन व श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन. दुपारी 1.30 वाजता तुळजापूर येथून कात्रज पुणे कडे रवाना होतील.