धाराशिव – समय सारथी
राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 7 व 8 ऑगस्ट रोजी दोन दिवशीय धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असुन ते धाराशिव येथे जनता दरबार तर तुळजापूर येथे भव्य नागरी सत्कार सोहळ्याला उपस्थितीत राहतील. बावनकुळे यांच्या दौऱ्याची जय्यत तयारी भाजपने केली आहे, जनता दरबार सह सर्व कार्यक्रमांना उपस्थितीत रहावे असे आवाहन आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने 7 ऑगस्ट रोजी बावनकुळे सकाळी 11.30 वाजता जनता दरबार घेतील त्यानंतर दुपारी 12.15 वाजता जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या समवेत महसूल,मुद्रांक शुल्क व नोंदणी आणि भूमी अभिलेख विभागाचा आढावा घेतील.3.15 वाजता पत्रकार परिषद, 3.45 वाजता भाजप कार्यालयात बैठक घेतील. सायंकाळी 5 वाजता तुळजापूर येथे आगमन व आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.सायंकाळी 5.25 वाजता भवानी तीर्थकुंड,घाटशीळ रोड पार्किंग तुळजापूर येथे श्रीक्षेत्र तुळजापूर विकास आराखडा मंजूर केल्याबद्दल तुळजापूर नागरी सत्कार सोहळा समितीच्या वतीने आयोजित नागरी सत्कार कार्यक्रमाला उपस्थिती.सायंकाळी 6.25 वाजता मोटारीने तुळजापूर येथून मुरूम ता.उमरगाकडे प्रयाण.सायंकाळी 7.25 वाजता श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना मुरूम येथे आगमन व राखीव 7.45 वाजता शेतकरी मेळाव्याला उपस्थिती.रात्री मुरूम येथे मुक्काम करतील.
8 ऑगस्ट रोजी सकाळी 8.30 वाजता मोटारीने मुरूम येथून उमरगाकडे प्रयाण.सकाळी 8.45 उमरगा येथे आगमन व भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.संताजी चालुक्य यांचे निवासस्थानी भेट.सकाळी 9 वाजता उमरगा येथून अंबड जि.जालनाकडे प्रयाण करतील.