अजित पवार व राष्ट्रवादीवर नव्हे तर काही लोकांवर राग – महानगरपालिका लागताच मवाळ भुमिका
धाराशिव – समय सारथी
राष्ट्रवादी विरोधात आक्रमक असलेले भरत गोगावले यांच्या महानगरपालिका निवडणूक लागताच राग निवळल्याचं पाहायला मिळत असुन त्यांनी मवाळ भुमिका घेतली आहे.
गोगावले यांनी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन विविध पुजा करून आशीर्वाद घेतले त्यानंतर त्यांनी पत्रकार यांच्याशी संवाद साधला. यावेळी शिवसेना नेते अमर राजेपरमेश्वर कदम, प्रक्षाळ पुजारी मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते.
अजित पवार व राष्ट्रवादी पक्षावर माझा राग नाही, पक्षातील काही लोकांवर राग असल्याचं शिवसेना मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले तर राज्यात 18 ठिकाणी शिवसेना-भाजप युती फीस्कटली, युती फिस्टकल्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढणार असल्याची मंत्री भरत गोगावले यांनी माहिती दिली.












