धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरात पुन्हा एकदा मसाज पार्लर सुरु झाले असुन त्या ठिकाणी अनैतिक प्रकार सुरु आहेत याची खात्री आमच्या प्रतिनिधिने स्वतः केली आहे मात्र आश्चर्यजनक पोलिसांना ते सापडत नाहीत. निर्लज्ज पणाचा हा कळस असुन धाराशिव शहराची संस्कृती लिलाव करणे आहे असेच म्हणावे लागत आहे, यासाठी कोणाशी संपर्क करावा हे सांगण्याची वेगळी गरज नाही. स्वर्गीय अर्थात हेवन बंद झाले असले तरी अर्थ म्हणजे पृथ्वी गोल आहे त्या प्रमाणे मसाज पार्लरचे तिथे सुरु असुन हवे असेल ते सुख तुम्हाला मिळू शकते. ज्या भागात हे सुरु आहे त्या ठिकाणी असलेले आंनद नगर ठाणे प्रभारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस अधिक्षक हे यासाठी सत्कारास पात्र असुन त्यांना नागरिकांनी दिसेल तिथे किमान एक 1 रुपयाचे गुलाबाचे फुल देणे गरजेचे आहे. या लोकांनी धाराशिव शहरासाठी फार महान कार्य केले आहे, त्यासाठी त्यांचे आभार मानने हे नागरिक म्हणुन परम कर्तव्य आहे.
मसाज पार्लर सुरु करणारे व्यापारी आहेत मात्र आपणं रक्षक आहेत की त्याचे संरक्षक यासाठी हा आत्मचिंतन करणारी ही बातमी. आपणं या ठिकाणी गेलात तर कायदेशीर अडचण येणार नाही असे तिथे लोक अभिमानाने सांगत आहेत. रस्ता, शिक्षण, पाणी, रोजगार हा विकास बाजूला राहिला तरी चालेल मात्र हे मसाज पार्लर रुपी विकास (उपहासत्मक) अभिमानास्पद व कौतुकास पात्र आहेत.
मोठ्या शहरात हे सगळे खुले आम सुरु आहे मात्र धाराशिव येथील काही लोकांना विकासाचे व्हिजन नाही, हे सुरु व्हायला हवे असाही आरोप करणारी तज्ज्ञ मंडळी इथे आहेत. इथे सुरु झाले तर लोकांचा प्रवास वेळ, आर्थिक वेळ वाचेल असा व्यापक हेतू आहे, त्याला साथ राजकीय नेते, पोलीस यांची आहे मात्र पत्रकार यांची खुजी मानसिकता, विकास व्हिजन नाही असा आरोप होत आहे.