कौटुंबिक मेळावा संपन्न – हजारो कोटींचा विकास निधी, भुषण पुरस्काराचे वितरण
कौटुंबिक मेळावा संपन्न – हजारो कोटींचा विकास निधी, भुषण पुरस्काराचे वितरण
पुणे – समय सारथी
कात्रज येथील कौटुंबिक स्नेह मेळाव्यात प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांना विकासाच्या मुद्द्यावर आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. रविवारी पुण्यातील माऊली गार्डन मंगल कार्यालय, कात्रज येथे भूम, परांडा, वाशी येथील बांधवांचा “कौटुंबिक स्नेह मेळावा” उत्साहात पार पडला. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती लाभली होती महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे ज्येष्ठ चिरंजीव, कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष गिरीराज सावंत यांच्या नेतृत्वात मेळावा पार पडला.
या मेळाव्यात गिरीराज सावंत यांनी मतदार बंधू-भगिनींशी संवाद साधत भूम परांडा वाशी मतदारसंघाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि सर्वांगीण विकासासाठी येत्या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी सावंत साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले.
आजवर मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्री सावंत यांनी हजारो कोटींचा विकास निधी आणला आहे. सावंत यांचा विकासाचा अजोड प्रवास आजही अविरत सुरू आहे. आपल्या मतदारसंघाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी सावंत यांनी अहोरात्र काम करत आहेत. त्यामुळे आता आपण ठरवलं पाहिजे की, ही विकासाची गंगा अशीच सतत वाहती ठेवायची असेल, तर सावंत यांना पुन्हा विधानसभेत पाठवायला हवं. विकासाला साथ देण्याचं आवाहन यावेळी गिरीराज सावंत यांनी उपस्थितांना केले.
आता ही निवडणूक फक्त एक राजकीय लढाई नाही, ही आपल्या विकासाची लढाई आहे. सावंत यांनी सुरू केलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत. अनेक प्रकल्प अंतिम टप्प्यात आहेत, त्या सर्वांची पोचपावती आपल्याला सावंत यांना द्यायची असेल, तर सावंत यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवून, मतदान रुपी आशीर्वाद द्यावा लागेल.आपण सर्वांनी एकत्र येऊन तानाजीराव सावंत यांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवून आपल्या धाराशिव जिल्ह्याच्या विकासाच्या प्रवासाला अधिक बळ द्यायचं आहे असा निर्धार केला.
कार्यक्रमात दक्षिण पुणे, कात्रज परिसरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना “भूम परांडा वाशी भूषण पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यसिद्धी प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीराज सावंत व मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वात झालेल्या विकासकामांचे कौतुक करत, त्यांना आगामी निवडणुकीत पुन्हा एकदा प्रचंड मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाचे आयोजन उद्योजक चंद्रकांत सरडे, उद्योजक राजाभाऊ शेळके, उद्योजक रामभाऊ पवार व मित्र परिवार यांच्या वतीने करण्यात आले होते.
यावेळी दशरथ पाटील साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन), किरण काकासाहेब घोरतळे (पत्रकार), श्री.आकाश फासगे, भाऊसाहेब कोकाटे (प्रसिद्ध निवेदक), मोहनराव तिपाले (उद्योजक), नाना पिंगळे, नदीम भाई मुजावर, एव्हरेस्ट देशमुख (युवा उद्योजक), डॉ. सुचेता भालेराव (भैरवी सोशल फाउंडेशन), श्री.रमेश गणगे, भागवत तनपुरे (कामगार नेते), अमित गायकवाड (प्रसिद्ध वकील), शहाजी गोरे (युवा उद्योजक), तात्या सरोदे (शासकीय अधिकारी), गणेश कुलकर्णी, अशोक शिंदे, चंद्रकांत कुलकर्णी, संतोष गाजरे, मारुती शिंदे (वरद एंटरप्रायझेस), डॉ.गरड, राविभाऊ बोरुडे, अतुल भराटे (Alpha Classes चा संस्थापक), तानाजी कुदळे (Swiftcon Lift’s Pvt Ltd), दत्ता भांडवलकर (युवा उद्योजक), दिलीप काळे, सुरेश काळे, सचिन शेळगावकर, जयराम रगडे, भागवत वेताळ (युवा उद्योजक) व भूम परांडा वाशी येथील रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.