पाडव्यापर्यंत उजनीचे पाणी येणार, स्वस्थ बसणार नाही – भुम परंडा वाशी भुषण पुरस्कारांचे वितरण
पुणे – समय सारथी
वाशी परंडा भुम येथील पुण्यात स्थायिक असणाऱ्या रहिवाशी यांचा कौटुंबिक स्नेह मेळावा पुणे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला, यावेळी आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी उपस्थितीत यांना मार्गदर्शन केले. मंत्री सावंत यांच्या हस्ते भुषण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह मान्यवर उपस्थितीत होते, या कार्यक्रमाचे आयोजक चंद्रकांत सरडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. पाडव्यापर्यंत उजनीचे पाणी येणार असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगत भुम परंडा वाशीसह धाराशिव जिल्ह्याचा आकांक्षित व मागासलेला शिक्का पुसायचा असल्याचे सांगितले. मंत्री सावंत यांनी त्यांचा जीवन संघर्ष मांडत राजकीय नेत्यांना सुचक इशारा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी 16 हजार 500 कोटी रुपयांचा निधी मंजुर केला. जेऊर बोगद्यातुन मिरगव्हाण येथे पाणी आणण्याचे योजनेचे 95 टक्के काम पुर्ण झाले आहे. पाणी आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही असे मंत्री सावंत म्हणाले. हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याने शेतकरी समृद्ध होणार आहे. आकांक्षित मागास जिल्हा हा डाग पुसायचा आहे.पाडाव्यापर्यंत उजनीचे पाणी आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे ते म्हणाले.
भैरवनाथ समुहाच्या माध्यमातून शिवजलक्रांती योजनेतुन जवळपास 700 किमी नाला खोलीकरण, सरळीकरण कामे केली त्यामुळे टँकरमुक्तकडे वाटचाल सुरु आहे. आमच्या हक्काच्या पाण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरणचा प्राधान्यक्रम बदलला त्यामुळे हे पाणी आता लवकरच या भागात येणार असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले.
आगामी कामात निवडणुका येत आहेत, विकासाच्या गप्पा थापा नसता काम नये, लोकप्रतिनिधी यांनी विकास केला पाहिजे त्यामुळे मागासलेला आकांक्षित जिल्हा ही ओळख पुसायची असेल तर महायुतीचे सरकार आणले पाहिजे यासाठी शिवधनुष्य हाती घेऊन काम करावे असे आवाहन केले.
सत्तापरिवर्तणाची सुरुवात धाराशिव जिल्हा परिषदेत केली व भाजप शिवसेना युतीचे सरकार स्थापन केले त्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन झाले त्यात मराठवाड्याचा यात सिंहाचा वाटा आहे, हे विसरता कामा नये.मराठवाड्यातील नेते चमत्कारीक, कष्टाळू असतात त्यामुळे त्यांना सन्मानाची वागणुक द्या अशी नेते मंडळीना मंत्री सावंत यांनी विनंती करीत सुचक इशाराही दिला. एखाद्या गोष्टीचा ध्यास घेतला तर आम्ही ती कोणत्याही स्तिथीत पुर्ण करतो, आम्ही स्वाभिमानी असल्याने आमच्या शेपटीवर कोणी पाय दिला तर आम्ही त्याला सोडत नाही ही वस्तूस्तिथी असल्याचे त्यांनी सांगितले.
धाराशिव जिल्हा इतके दिवस मागास का राहिला त्याला जबाबदार कोण याचे परीक्षण जनतेने केले पाहिजे. 1972 पासुन अनेक जण पुणे येथे आले ज्याच्या पोटात आग आहे त्यांना राग असतो असे सांगत त्यांनी जेएसपीएम शिक्षण संस्था व भैरवनाथ साखर कारखाने सुरु केल्याचा संघर्ष व यशोगाथा सांगितली.
आरोग्य विभागात एकाही गोष्टी,योजनेला मुख्यमंत्री नाही म्हणाले नाहीत, मोफत उपचार सुरु केले. अनेक महत्वाचे निर्णय घेतले. माता सुरक्षित घर, सुरक्षित योजना राबवली. तरुणांच्या व्यसनमुक्तीसाठी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे असा उपक्रम राबवीला व त्याचे फ्लेक्स बिअर बार समोर लावले, जागरूक पालक सुदृढ बालक ही योजना राबविली असे सांगत त्यांनी आरोग्य विभागाच्या योजनाची माहिती दिली.
संविधान बदलणार, आरक्षण रद्द होणार, मोदी मुस्लिम यांना भारतातुन हकलून देणार अश्या अफ़वा पसरविल्या जात असल्याचे मंत्री सावंत यांनी सांगितले. आमचा पक्ष चोरला, पक्षप्रमुख यांना मानाचे स्थान दयायचे असे सांगत भावनिक वातावरण केले जात आहे. लाडकी बहीण योजना बाजूला करण्यासाठी बदलापूर घटनेच्या माध्यमातुन आंदोलनाला समोर केले गेले. मुलींना उच्च शिक्षणपर्यंत मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, 100 टक्के फी सरकार भरणार आहे.मुलींच्या संपूर्ण शिक्षनाचा खर्च सरकार उचलणार आहे. सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला हे विरोधकांना आवडतं नाही म्हणून नरेटिव्ह सेट केले जात आहे असे ते म्हणाले.