कोयत्याने डॉक्टरवर हल्ला – वैद्यकीय महाविद्यालयातील पाठबळ कोणाचे ? शोधून ठोस कारवाई करा
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रात्री उशीरा अधिकारी यांची बैठक घेऊन सुरक्षा यंत्रणा व तिथल्या सुविधाचा आढावा घेतला. एका डॉक्टरच्या मानेला कोयता लावुन धमाकावले, जीवघेणा हल्ला होत असेल तर ती गंभीर बाब आहे. गुंड प्रवृतीच्या लोकात पोलिसांची दहशत निर्माण करा, सुरक्षा वाढवा असे ते म्हणाले. यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक शफकत आमना, डीन शैलेंद्र चौहान उपस्थितीत होते.
वैद्यकीय महाविद्यालय परिसरात अश्या घटना घडत असतील तर ती गंभीर बाब आहे असे पालकमंत्री म्हणाले. या गुंड प्रवृतीच्या लोकांना रुग्णालय व विद्यालयातील आतील कोणी पाठबळ देत असेल तर त्यांची चौकशी करा व त्यांच्यावर कठोर कारवाई करा असे आदेश दिले. तो बाहेरून दारू पिऊन आला की आत कोणी पाजली हे समोर यायला हवेत. असे प्रकार भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजना राबवा असे म्हणाले. पालकमंत्री यांना इथे येऊन रात्री 11 वाजता बैठक घ्यावी लागते हे दुर्दैव आहे. अश्या घटनामुळे जिल्ह्याची बदनामी होते हे पुन्हा घडले नाही पाहिजे, यासाठी जे करायचे ते करा अशी तंबी दिली.वैद्यकीय महाविद्यालय परिसरातील असलेल्या पोलिस चौकीत किती पोलीस, सुरक्षा असते याची माहिती मंत्री सरनाईक यांनी विचारली त्यावर 1 पोलिस निरीक्षक दर्जाचा अधिकारी व 6 कर्मचारी असे 24 तास कार्यरत असल्याचे सांगितले. ते हजर असतानाही असे प्रकार घडत असल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. पोलिस फक्त चौकीत बसण्यासाठी ठेवले आहेत का असा सवाल त्यांनी केला. सुरक्षा रक्षक कंपनीची चुक आहे मात्र त्यांच्यावर जबाबदारी दोष टाकून, जबाबदारी झटकून चालणार नाही असे पालकमंत्री म्हणाले.
त्या भागात सुरक्षा रक्षक कंपनीचे कर्मचारी असतात त्यांच्या दुर्लक्षाने हे झाले. ते निशस्त्र असल्याने त्यांची कोणाला भिती वाटत नाही.पोलिस विभागाने सुरक्षा संदर्भात ऑडिट केले असुन किमान मुख्य भागात जे सुरक्षा रक्षक तैनात आहेत त्यांच्याकडे तरी शस्त्र असावे, असे कळविले आहे. घटना घडल्यावर तक्रार द्या असे सांगितले तरी सुद्धा तक्रार दिली जात नाही याबद्दल पोलिस अधीक्षक शफकत आमना यांनी नाराजी व्यक्त केली.
आरोपी हातात कोयता घेऊन आला, ही गंभीर बाब आहे, वारंवार अश्या घटना घडत असल्याची माहिती मला मिळाली आहे, 6 महिन्यात अश्या 2 घटना घडत असतील तर यावर ठोस पावले उचलणे गरजेचे आहे. खासगी सुरक्षा रक्षक असले तरी त्यांची जबाबदारी आहे, जे लोक येतात त्यांच्यावर लक्ष ठेवणे, तलाशी घेणे. तिथे पोलिसांची भिती वाटायला हवी, खासगी सुरक्षा रक्षक यांची भिती वाटून काही उपयोग होणार नाही, तिथे 6 पोलिस आहेत याची भिती दहशत अश्या गुन्हेगारी प्रवृत्तीला असायला हवी असे पालकमंत्री म्हणाले.