धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या 503 कोटी रुपयांच्या 8 लाख 26 हजार चौरस फ़ीट बांधकामाच्या अंदाज पत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली असुन लवकरच निविदा प्रक्रिया सुरु होईल अशी माहिती आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे. आज जागतिक आरोग्य दिनी ही शुभवार्ता ठरली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय धाराशिव येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न 430 खाटांचे रुग्णालय व इतर अनुषंगिक इमारतींचे बांधकाम अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ व महायुती सरकारचे आभार मानले आहेत.