धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणातील माजी सभापती शरद जमदाडे व आबासाहेब पवार या 2 आरोपीची वाढीव पोलिस कोठडी संपल्यावर त्यांना धाराशिव येथील कोर्टात हजर केल्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, त्यांची रवानगी जेलमध्ये करण्यात आली. जिल्हा सरकारी वकील ऍड सचिन सुर्यवंशी यांनी कोर्टात बाजु मांडली, पोलिसांनी वाढीव कोठडी मागितली मात्र 2 वेळेस त्याचं तपासाच्या मुद्यावर 11 दिवसांची पोलिस कोठडी दिल्याने तिसऱ्यांदा कोठडी देण्यास नकार दिला.

6 आरोपींच्या जामीन अर्जावर 28 मे रोजी सुनावणी होणार आहे त्यात 5 जन फरार आहेत तर राहुल कदम परमेश्वर जेलमध्ये आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी गुन्ह्यात 36 जन आरोपी असुन 18 आरोपी फरार आहेत तर 18 जन अटकेत आहेत, त्यातील 17 आरोपी जेलमध्ये तर 1 आरोपी नानासाहेब खुराडे हा 2 जुनपर्यंत 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत आहे, फरार आरोपींच्या अटकेसाठी पोलिसांची पथके नेमण्यात आली असुन शोध सुरु आहे.
सेवन गटातील फरार आरोपी विशाल सोंजी,अभिजीत अमृतराव, जगदीश कदम पाटील यांच्यासह तस्कर गटातील फरार आरोपी संतोष कदम परमेश्वर, उदय शेटे व जेलमधील राहुल कदम अश्या 6 जणांच्या अर्जावर 28 मेला सुनावणी होणार आहे. सेवन गटातील अलोक काकासाहेब शिंदे याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 29 मे ला सुनावणी तर जेलमधील तस्कर सुलतान उर्फ टिपू शेखच्या जामीनावर कोर्ट 29 मे रोजी निर्णय देणार आहे.
माजी सभापती शरद जमदाडे व माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे यांचा भाचा आबासाहेब पवार याला अटक केल्यानंतर कोर्टात दिलासा मिळेल अशी अपेक्षा सेवन गटाला होती मात्र कोर्टाने 2 वेळेस 11 दिवसांची पोलिस कोठडी दिली त्यानंतर 27 मे रोजी जिल्हा न्यायाधीश टी जी मिटकरी यांनी न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
धाराशिव येथील कोर्टाने यापुर्वी 9 जणांचा जामीन नाकारला असुन 8 जणांचे जामीन अर्ज सुनावणी स्तरावर प्रलंबित आहेत, त्यात 4 आरोपी सेवन तर 4 आरोपी तस्कर गटातील आहेत. तुळजापूर ड्रग्ज तस्करीत 36 आरोपी पैकी 16 तस्कर व 2 सेवन गटातील आरोपी अटकेत आहेत. तस्कर गटातील 26 पैकी 10 आरोपी फरार आहेत तर सेवन गटातील 10 पैकी 8 आरोपी फरार आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोकर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख, जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.