यांचा आदर करा,उपकृत भावना ठेवा – 2021 पासुनच्या बुकीचा पर्दाफाश, पुरावे हाती
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे पोलिसांनी मोठी कारवाई करीत मटका रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. ड्रग्ज तस्करीतील सेवन गटातील आरोपी विनोद विलास गंगणे यांच्यासह अमोल माधवराव कुतवळ, विक्रम नाईकवाडी, चैतन्य शिंदे,सचिन पाटील यांच्यासह तब्बल 33 जणांना पोलिसांनी आरोपी केले असुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम कलम 4 व 5 नुसार तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी मलबा हाईट्स येथे एका फ्लॅटमध्ये छापा मारल्यानंतर ह्या बुकीचा पर्दाफास झाला, छाप्यात पोलिसांना 6 मोबाईल, 1 लॅपटॉप, प्रिंटर, 65 हिशोबाच्या नोंद वह्या सापडल्या आहेत. 20 सप्टेंबर 2021 पासूनच्या मटका, एजन्ट, कमिशन व इतर आर्थिक व्यवहाराच्या नोंदी या 65 कागदपत्रात आहेत.
अनेक घरे उध्वस्त व तरुण पिढीचे आयुष्य बरबाद करणाऱ्या (सत्कारमुर्ती) यांचा आदर करा,उपकृत भावना ठेवा असेच म्हणाले लागेल. एकंदरीत तुळजापूर येथे ड्रग्ज, मटका अश्या अवैध धंदयात काँग्रेस, भाजपसह इतर पक्षांचे मुख्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी असल्याचे दिसते, त्यांना व अवैध धंद्याना राजकीय पाठबळ मिळत आहे. नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्या असुन याचे पडसाद त्यात उमटणार आहेत. गंगणे व कुतवळ यांच्या मटका बुकीचा इतिहास मोठा असुन अनेक गुन्हे नोंद झाले आहेत. ड्रग्ज तस्करीत गंगणे हे फरार असले तरी त्यांचा मटका बुकीचा व्यवसाय सुरु होता मात्र तो पोलिसांनी पकडला आहे.
तुळजापूर येथील मटका कांडात विक्रम दिलीप नाईकवाडी, चैतन्य मोहनराव शिंदे,अमोल माधवराव कुतवळ, सचिन पाटील, विनोद विलासराव गंगणे, राम मांगडे, विजय निंबाळकर, ज्ञानेश्वर जाधव, संतोष जगताप, मोहन मोहरकर, कृष्णा काळे, मिथुन पोकळे, अजाज शेख, राम हरी मस्के, हसन नाईकवाडी, संतोष रोकडे,कुलदीप गरड, अक्षय खराडे, गाढवे, विकी पोकळे, सुभाष पारवे, सागर शिंदे, शुभम क्षीरसागर,अंबादास राशीनकर, श्रावण जाधव, जीवन बोबडे, विकास दिवटे, रवींद्र ढवळे, निलेश तेलंग, अशपाक मुलानी,गणेश देशमुख, तात्या कदम, वडाळा फिरती अशी आरोपींची नावे आहेत.
कल्याण व मिलन नावाचा मटका हे चालवत असुन बुकीचालक सांगोला फिरती, वडाळा फिरती, देशमुख फिरती, मोहोळ फिरती यांच्याकडे पाठवत असत व त्यांच्यासोबत मिळून तुळजापूर शहरात मटका चालवीत असत, या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे करीत आहेत.
गुरुनाथ लोखंडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालयातील सपोनि कोळेकर, अश्विनी जाधव,पोहेकॉ पिरजादे, जाधव, तुळजापूर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक थोटे, पोअ शिरगिरे, पवार, कवडे, उपविभाग कार्यालयातील जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली