धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण सर्वेक्षण प्रशिक्षनचा धाराशिव जिल्ह्यासह राज्यभरातील अनेक जिल्ह्यात फज्जा उडाला आहे. धाराशिव, लातूर, नांदेडसह अनेक जिल्ह्यात ट्रेनर न आल्याने प्रशिक्षण होऊ शकले नाही. मराठा आरक्षण सर्वेक्षण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात येणार होते.
धाराशिव जिल्ह्यात अनेक अधिकारी प्रशिक्षणासाठी जिल्हाभरातून आले मात्र ट्रैनिंग देण्यासाठी ट्रेनर न आल्याने अधिकारी ताटकळले आहेत, सकाळी 10 वाजता होणारे प्रशिक्षण आता दुपारी किंवा उद्या होणार असल्याची माहिती आहे त्यामुळे सरकारला मराठा आरक्षण बाबत कितपत गांभीर्य आहे हे समोर येत आहे. विशेष म्हणजे मनोज जारांगे पाटील यांच्या नेतृत्वात लाखों मराठे मुंबईच्या दिशेने आज कूच करीत आहेत त्यातच हा ढिसाळपणा समोर आला आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी येऊन थांबले मात्र गोखले इन्स्टिटयूटचा प्रशिक्षक आलाच नाही, आज सकाळी 10 वाजता प्रशिक्षणाला सुरुवात होणार होती.