आंदोलन व जल्लोषाचा “सांजा” पॅटर्न गाजला, फेटा बांधून पुष्पवृष्टीने मिरवणुक काढत स्वागत
धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षण मिळाल्याचा जल्लोष धाराशिव जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरु आहे. सांजा या गावातील हजारो आंदोलक हे मुंबई येथे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ गेले होते, आंदोलन यशस्वी करुन हे आंदोलक धाराशिव येथे आल्यावर त्यांचे धाराशिव शहरात व सांजा या गावात त्यांचे भव्य दिव्य स्वागत करण्यात आले. जेसीबीतुन फुले व गुलालाची उधळण आंदोलकावर करण्यात आली. मराठा आरक्षण लढ्यात आंदोलन व त्यानंतर जल्लोषाचा “सांजा” पॅटर्न गाजला आहे. आंदोलकांना फेटा बांधून हार घालून पुष्पवृष्टी करीत ट्रकटरवर त्यांची मिरवणुक काढत स्वागत केले.
मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सांजा या गावातील मराठा, मुस्लिम व इतर बांधवाचा सहभाग मोठा राहिला, प्रत्येक वेळी ते आंदोलनात सहभागी झाले. कँडल मार्च, रस्ता रोको असो की ट्रॅक्टर रॅली त्यांनी वातावरण निर्मिती केली त्याचं बरोबर मुंबई येथील आंदोलनात तरुण, ज्येष्ठ नागरिक हे एक महिन्याचा किराणा भरून सहभागी झाले होते.