धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात बोलणाऱ्या भाजपा नेत्यांचा मराठा समाजाच्या वतीने धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आंदोलन करीत निषेध करण्यात आला. फडणवीसच्या पाळीव कुत्र्यांची उपमा देत आमदार यांचा निषेध करण्यात आला. कुत्र्याच्या शरीराला नेत्यांचे मुखवटे लावलेले बॅनर घेत यांच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या तसेच प्रतिकात्मक फोटोला जोडे मारो आंदोलन धाराशिव येथे करण्यात आले.
मनोज जरांगे विरोधात दररोज एक भाजपचा मंत्री बोलत असल्याने येणारा सरकारसाठी महागात पडणार आहे. नारायण राणे यांनी धाराशिवात येऊन दाखवावे आल्यावर त्यांना पहिला दगड मीच मारणार असा इशारा आंदोलकांनी दिला. मनोज जरंगेचे विरोधात बोलणे वेळीच थांबावे अन्यथा समाज आपली जागा दाखवील, अशा प्रकारे वक्तव्य करून जातीय तेढ निर्माण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. नितेश राणे यांनी मनोज जरांगे बद्दल जीभ हसडू असे म्हणले त्यामुळे त्यांना जेवायला व धुवायला सुद्धा हात राहणार नाहीत असे आंदोलक म्हणाले.