धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील हे मुंबई येथील आझाद मैदानावर आमरण उपोषण करीत आहेत. मराठा आरक्षण मिळावे अशी भुमिका घेत या आंदोलनाला विकासरत्न आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी पाठिंबा दिला आहे तर त्याचे पुतणे माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा शिवसेना नेते धनंजय दादा सावंत यांनी मुंबई येथे आंदोलन स्थळी जात जरांगे यांची भेट घेतली. दररोज 20 हजार पाणी बॉटल व 10 हजार नाश्ता पॉकेट देण्याची जबाबदारी घेतली आहे.
धनंजय सावंत हे स्वतः या आंदोलनात सहभागी झाले असुन त्यांनी मराठा बांधवांची सेवा करण्यासाठी यंत्रणा कामाला लावत सज्ज केली आहे. अमोल लाखे पाटील व विकी दादा चव्हाण यांच्या खांद्यावर त्यांनी नियोजनाची धुरा टाकली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत दररोज 20 हजार पाणी बॉटल व 10 हजार नाश्ता पॉकेट आझाद मैदानावर पोहोच व वितरीत केले जाणार आहेत. मराठा आरक्षण आंदोलनात आजवर सावंत परिवार सक्रिय सहभागी झाला असुन त्यांनी वेगवेगळी जबाबदारी घेत कर्तव्य पार पाडले आहे.