उमरगा – समय सारथी
हैदराबाद गॅझेटनुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी गेली 8 दिवसापासुन धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा या गावात विनायक पाटील यांचे आमरण उपोषण सुरु आहे. मराठा आरक्षणासाठी विनायक पाटील यांनी देहत्याग करण्याचा संकल्प केला असुन ते मागणीवर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उमरगा येथे आल्यावर त्यांनी चर्चेदरम्यान विनायक पाटील यांना मुंबई येथे या, आपण चर्चा करु मात्र उपोषण सोडा असे फोनवर सांगितले मात्र पाटील यांनी चर्चेचा प्रस्ताव धुडकावून लावत मागणीवर ठाम आहेत.
हैदराबाद गॅझेट नुसार मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील कवठा या गावात विनायक पाटील हे गेली आठ दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहे. हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यातील 38% जनता कुणबी असल्याच्या नोंदी आहेत शिवाय शिंदे समितीने देखील ते गॅझेट लागू करण्याचे शिफारस केली आहे तरी देखील राज्य सरकार सगळे सोयऱ्याच्या भानगडीत अडकावून अवहेलना करू नये.
मराठवाड्यातील मराठ्यांना हैदराबाद गॅझेटनुसार कुणबी प्रमाणपत्र दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका उपोषण करते विनायक पाटील यांनी घेतले आहे एवढेच नाही तर जोपर्यंत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत पाणी देखील पिणार नसल्याचे विनायक पाटील यांनी सांगितले आहे