धाराशिव – समय सारथी
बीडचा बिहार झाला आता धाराशिवचा बिहार नको अशी भुमिका घेत मंत्री धनंजय मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री पद नको म्हणुन मराठा समाज आक्रमक आला आहे. मराठा समाजाच्या बांधवानी जिल्हाधिकारी यांचे मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत विरोध केला आहे.
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची व त्याबद्दल बीडचे पालकमंत्री करू नका यासाठी बीडमध्ये मोठा विरोध होत असल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना धाराशिवचे पालकमंत्री पद देऊ नये यासाठी मराठा समाजातील कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री पदाला विरोध करत आपल्या मागणीचे निवेदन प्रशासना मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे मारेकरी व मदत करणाऱ्या आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील मंत्री धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री होण्यासाठी हालचाली चालू आहेत, त्यांना जिल्ह्याचे पालकमंत्री करु नये. बीडचा बिहार झाला असून धाराशिवचा बिहार करू नये त्यासाठी आम्ही मुंडे यांच्या नावाला विरोध करत असल्याचे मराठा समाजातील कार्यकर्त्यांनी भुमिका स्पष्ट केली.