धाराशिव – समय सारथी
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालवत असल्याने धाराशिव येथील मराठा आंदोलक आक्रमक झाले असुन रस्त्यावर उतरले आहेत. आंदोलनाचा वनवा पेटला असुन तीव्रता वाढली आहे, धाराशिव शहर बंद करण्यात आले असुन जिजाऊ चौक, शिंगोली येथे चक्काजाम करण्यात आला आहे. शहरासह ग्रामीण भागातून तरुण आंदोलनस्थळी जमायला सुरुवात झाली आहे.
मराठा समाजाने चक्काजाम आंदोलनात छत्रपती शिवाजी महाराज चौकात चुली मांडत जेवण करुन दुपारची न्ह्यारी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बैलगाडी आणत आंदोलन सुरु केले आहे. सरकारने मराठा आरक्षण अंमलबजावणी करावी व जरांगे यांचे उपोषण मागे घेण्यासाठी प्रत्यन करावे अशी मागणी आहे.
सकाळी 10 वाजता मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनाथ सांजा गावातील मराठा बांधव आक्रमक झाले. बैलगाडी, दुचाकी घेऊन धाराशिव शहराकडे कूच करीत शिवाजी चौक येथे ठाण मांडले. आंदोलनकर्त्यांनी बेमुदत धाराशिव शहर बंदची घोषणा केली आहे, त्यानुसार अंमलबजावणी पण करीत शहर कडकडीत बंद केले. सरकार विरोधी घोषणा देत तरुणांनी दुकाने बंद केली.
नारायण राणे याचा पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले त्यानंतर काही तरुण आक्रमक झाले त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बॅनरवर दगडे मारून ते फाडले मात्र ज्येष्ठ मराठा बांधव यांनी हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला. खासदार ओमराजे व आमदार कैलास पाटील यांची गाडी बार्शी नाका येथे अडवून परत पाठवण्यात आली.