तुळजाभवानीचा आशीर्वाद घेणार, विधानसभेची तयारी
धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे 5 व 6 ऑगस्ट रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत, त्यांचा हा नवनिर्माण दौरा असणार आहे. 5 ऑगस्ट रोजी राज ठाकरे हे रात्री मुक्कामी येणार आहेत. तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन ते धाराशिव येथे येतील. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे मनसे जिल्हा सचिव दादा कांबळे यांच्या हस्ते क्रेनच्या सहाय्याने भव्य स्वागत करुन हार घातला जाईल. पुष्पकपार्क येथे विधानसभा आढावा बैठक घेण्यात येईल.
6 ऑगस्ट रोजी मंगळवारी जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, उमरगा व परंडा या 4 ही विधानसभा मतदार संघाचा विधानसभा निहाय आढावा घेतील त्यानंतर दुपारी 2 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यावेळी हजर असणार असुन विधानसभा अनुषंगाने इच्छुक उमेदवार व पदाधिकारी यांच्याशी चर्चा करतील. राज ठाकरे यांचा वरीलप्रमाणे संभाव्य दौरा असुन त्याचे नियोजन सुरु आहे त्यामुळे वेळेत व कार्यक्रमात काही बदल होऊ शकतात.