धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाज बांधवांच्या आग्रहामुळे सुरु केले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. प्रकृती खालावत असल्याने मराठा समाज बांधवानी जरांगे यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली, ती विनंती जरांगे यांनी मान्य केली व उपोषण आंदोलन स्थगित केले. जारांगे यांनी सरकारला 13 ऑगस्टपर्यत वेळ दिला आहे. या दरम्यानच्या काळात जरांगे हे मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरणार आहेत.
सरकारने किंवा कोणी सांगितले म्हणुन उपोषण मागे घेत नाही, समाजाने आग्रह केला म्हणुन उपोषण स्थगित केले असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार व दरेकर यांचा त्यांनी समाचार घेतला.