धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील कारी या गावात चावडी बैठकीसाठी आलेले मराठा आरक्षण आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा समाचार घेतला. महाराष्ट्र, मराठी अस्मितेचा अपमान करणाऱ्याला फटके दिल्याशिवाय राहणार नाही, असा संतप्त इशारा त्यांनी दिला.
मनोज जरांगे म्हणाले की, “कोणीही जर महाराष्ट्राचा आणि मराठीचा अपमान करत असेल, तर तो नक्कीच फटके खाणार. सत्ताधारी गप्प बसतील, विरोधक गप्प बसतील… पण आम्ही गप्प बसणार नाही. त्यांनी जर काही कारवाई केली नाही, तर आम्हीच फटके देणार.”
निशिकांत दुबे यांनी केलेल्या मराठीविरोधी वक्तव्यावर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे. अशातच जरांगे पाटलांनी थेट कारवाईचा इशारा दिल्याने हिंदी-मराठी वाद पुन्हा उफाळण्याची चिन्हं आहेत.