धाराशिव – समय सारथी
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे 5 ऑगस्ट रोजी मंगळवारी धाराशिव शहरात येणार असुन त्यांच्या स्वागताची मोठी तयारी करण्यात आली आहे. सकाळी 10 वाजता जरांगे पाटील यांचे आगमन धाराशिव शहरात होणार असुन ते दिवसभर गाठी भेटी, बैठका घेऊन ते मुक्काम करतील त्यानंतर 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता सोलापूर येथे बैठकासाठी प्रयाण करतील. सकल मराठा समाजातील तरुणांनी या दौऱ्याचे नियोजन केले असुन स्वागताची जय्यत तयारी केली आहे. आगामी आंदोलन दिशा व इतर बाबीवर यात चर्चा, नियोजन व आढावा घेतला जाईल.