धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्रातील स्थानिक भाजप नेते व मराठा समाजाला सरसकट आरक्षण न दिल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात ठाण मांडून बसावे लागत आहे. मोदी यांनी स्वतःच चिन्ह सोडून दुसऱ्या चिन्ह्याचा प्रचार कधी केला नाही, स्थानिक भाजप नेत्यांनी त्यांच्यावर इतकी वाईट वेळ आणली आहे की निवडणुकीचे राज्यात 5 टप्पे पाडावे लागले. मनोज जारांगे पाटील यांनी धाराशिव येथील भवानी चौक येथे नारायणगड महासभेच्या प्रचाररथाचे उदघाटनकेले त्यावेळी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करुन मराठा समाजाने जंगी स्वागत केले.
जिथे 88 जागा आहेत तिथे एक टप्पा आहे मात्र महाराष्ट्रात 48 जागा असूनही 5 टप्पे आहेत ही वेळ स्थानिक महाराष्ट्रातील नेत्यांनी मोदी यांच्यावर आणली. महाराष्ट्रातील भाजप नेते मराठा समाजाचा द्वेष करतात त्यांना महाराष्ट्र सोडता येत नाही इथेच खरे मराठे जिंकले आहेत. एकजुटीला घाबरून ही वेळ आली आहे, इतक्या सभा घ्याव्या लागत आहेत. इतका वेळ मोदी यांनी कधी महाराष्ट्राला दिला नव्हता.
सगेसोयरे व मराठा कुणबी एक असल्याचा आदेश पारित नाही केला तर यापेक्षा जास्त वाईट वेळ भाजप नेत्यामुळे येऊ शकते. भाजपला मराठा समाजाने सत्ता दिली मात्र आमच्या आई बहिणीचे डोके फोडायचे व गुन्हे नोंद करायचे आजही सुरु आहे. मराठा समाजाने विधानसभेची तयारी एक महिन्यापुर्वी सुरु केली आहे, आरक्षण मागणी पुर्ण न झाल्यास मराठा समाज ताकतीने विधानसभा लढवणार असल्याचे जरांगे यांनी जाहीर केले.
मराठा समाजाने पाडायला पण शिकले पाहिजे, मराठा समाज यावेळी बरोबर कार्यक्रम दाखवणार आहे. जो मराठा कुणबी एक आहे याचा व सगेसोयरेचा विरोध करतो त्याला पाडा असे जरांगे म्हणाले.मी महायुती किंवा महाविकास आघाडीला पाठिंबा दिलेला नाही किंवा अपक्ष उभा केला नाही असे त्यांनी सांगितले.