धाराशिव – समय सारथी
आषाढीवारी संपेपर्यंत मराठा समाज कुठलेच आंदोलन करणार नाही असे मनोज जरांगे पाटील यांनी धाराशिव येथे स्पष्ट केले. सरकारने दिलेले 13 जुलैचा अल्टीमेटम संपताच मराठा समाज बांधवांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवणार असल्याचे त्यांनी सांगितले. सरकार सोबत रोजच बोलणी होत आहे मात्र आरक्षणाच्या विषयात महत्त्वाचे काहीच नाही मिळत अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सरकारने दिलेले 10 टक्के आरक्षण हे 27 टक्के ओबीसी आरक्षणात घेऊन ओबीसी आरक्षण वाढवा अशी मागणी त्यांनी केली.
सत्ताधारी व विरोधक हे हानले मारल्यासारखे करून मराठा आरक्षणाला विरोध करत आहेत, हे आम्ही ओळखल आहे. सगळे मंत्री व विरोधी आमदारांनी मराठ्यांना आरक्षण मिळावे म्हणून अधिवेशनात विषय लाऊन धरावा अन्यथा आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी जरांगे यांनी केली.
बीड जिल्ह्यातील दौऱ्याला पंकजा मुंडे व धनजय मुंडे यांचा उघड विरोध दिसत आहे. छगन भुजबळ यांनी सगळे ओबीसी नेते एकत्र करून आरक्षणाला विरोध केला. बीड जिल्ह्यातील दौऱ्याला न्याय म्हणून बघतो, आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढा लढतो आहे त्यामुळे शांतता रॅली काढतो आहे. शिंदे समितीला पुरावे मिळाले ती चांगली गोष्ट आहे याबाबत शंभूराजे देसाई व राज्य सरकारचे नेते सांगतील असे ते म्हणाले.