धाराशिव – समय सारथी
ओम्या, शेमडं पोरं .. तुझी औकात काय ? दिल्लीत काय दिवे लावले हे लोकांना माहिती आहे. जनतेसाठी पुढच्या 50 पिढ्या आम्ही असणार आहोत असे म्हणत युवा नेते मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्लाबोल केला. तुळजापूर नगर परिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष विनोद पिटू भाई गंगणे यांच्या पदग्रहण सोहळ्यानंतर सायंकाळी आयोजित भव्य सत्कार सोहळ्यात मल्हार पाटील बोलत होते त्यांनी त्यांच्या खास शैलीत पुन्हा एकदा ओमराजेवर टीका केली.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की आपल्याला नकारात्मक बोलायचे नाही. या ओम्याची औकात नाही हो ? पिटू भय्या.. याच्या बद्दल बोलायचे योग्य नाही. हा दिल्लीत काय दिवे लावतो हे लोकांनी ओळखले आहे त्यामुळे अश्या शेम्डया पोरांबद्दल बोलायचे नाही. आपल्याला सकारात्मक चांगल काम करून लोकांची सेवा करायची आहे. तुळजाभवानी मातेची बदनामी करायची हा याच्या प्रचाराचा मुद्दा होता मात्र ती आई भवानीने पुसुन काढली आहे असे मल्हार पाटील म्हणाले.
लोकसभेच्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांवर माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय ‘राक्षसी’ आनंद खासदाराला झाला होता. मात्र त्या आनंदाला आता जनतेनेच उत्तर दिले असून, त्याची खरी औकात मायबाप जनतेने दाखवून दिली आहे, धमक असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून दाखवा, मल्हार पाटील नाव बदलतो असे ओपन चॅलेंज मल्हार पाटील यांनी देत घणाघाती टीका केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा त्यांनी खासदार ओमराजे यांच्यावर टीका केली. बाळ.. नाद करायचा नाही या पॅटर्ननंतर शेमडं पोरं म्हणत औकात काढत टीका केली.
शहर, तालुका, जिल्ह्याची आपली टीम व टीमवर्क चांगले आहे. आपणं एकमेकासाठी झटतो, धावून येतो असे विरोधकात नाही आहे. त्याची पालिका, उमेदवार गेले, सगळे लोक गायब झाले, हे कुठेच कोणाच्या मदतीला सुख दुःखात येणार नाहीत. इथे आपणं आहोत, पुढच्या 50 पिढ्या असणार आहोत म्हणुन या भावनेने सेवा करायची आहे असे पाटील म्हणाले.
आई तुळजाभवानीची, इथल्या नागरिकांची सेवा करणे हे भाग्य व पुण्याची गोष्ट आहे, 2019 पासुन राणाजगजीतसिंह पाटील ती करीत आहेत याचा अभिमान आहे. तुळजापूर देशात, परदेशात ओळखले जाणारे भक्ती केंद्र आहे. तुळजापूर शहर, इथले नागरिक बदनाम व्हावे यासाठी अपप्रचार करण्याचे विरोधकांनी षडयंत्र रचले. देवीला त्रास व्हावा या तुच्छ भावनेने या लोकांनी प्रचार केला असा आरोप केला.
विनोद पिटू गंगणे यांच्यावर माझ्या वडिलांनी जिवापाड प्रेम केले त्यामुळे गंगणे हे त्यांची साथ सोडणार नाहीत हे त्यांना माहिती होते. मुलासारखं जोपसणाऱ्या विनोद पिटू गंगणे यांना बरबाद करण्याचे प्रयत्न या लोकांनी केले, टीका टिप्पणी करून कलंकित करण्याचे प्रयत्न केले पण तुळजाभवानी देवीने नगराध्यक्ष व नगरसेवक यांना विजय रुपी आशीर्वाद दिला असे ते म्हणाले.
35 हजार तुळजापूरची लोकसंख्या असतानाही इथे विकासासाठी व शहराचा कायापालट करण्यासाठी 1 हजार 864 कोटी रुपये दिले, तुळजापूर शहराच्या विकासाला प्राधान्य असल्याचे पाटील म्हणाले.










