धाराशिव – समय सारथी
65 व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा थरार आजपासुन धाराशिव येथे रंगणार सुरु झाला असुन आखाडा पूजनाने या स्पर्धेची सुरुवात झाली आहे. तुळजाभवानी स्टेडीयममध्ये कुस्तीचा आखाडा तयार करण्यात आला असुन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, तहसीलदार शिवानंद बिडवे,सुधीर पाटील, सुरज साळुंके, रहमान काझी, खंडेराव चोरे,रहमान काझी यासह मान्यवर यांच्या हस्ते नारळ फोडून व पुजन करुन करण्यात आला. कुस्ती महर्षी व तपस्वी बाळासाहेब लांडगे यांचा सत्कार करण्यात आला.
16 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर या काळात लाल माती व मॅट या दोन गटात ही स्पर्धा होणार असुन जवळपास 900 पैलवान सहभागी होणार आहेत. धाराशिव येथील तुळजाभवानी स्टेडियम येथे 2 लाल माती व 3 मॅटची मैदाने तयार केली असुन मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्यासह शरद पवार वेगवेगळ्या दिवशी येणार आहेत.
65 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा बहुमान यंदा धाराशिव जिल्ह्याला प्रथमच मिळाला असुन महाराष्ट्र केसरी विजेत्यास 5 किलो चांदीची गदा, स्कॉर्पिओ गाडी मिळणार आहे. 17 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजता या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या हस्ते होणार आहे. 36 जिल्ह्यातून 950 पैलवान 500 पंच 500 स्वयंसेवक दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.
प्रेक्षकांना कुस्ती पाहण्यासाठी व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे.18 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, 19 नोव्हेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व 20 नोव्हेंबर रोजी शरद पवार यांची उपस्थिती राहणार आहेत.
मुख्य कार्यवाहक तथा युवा उदयोजक अभिराम सुधीर पाटील, आदित्य पाटील,नवनाथ जगताप, राष्ट्रवादीचे महेंद्र धुरगुडे, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे विभागीय सचिव वामनराव गाते यासह पदाधिकारी उपस्थितीत होते.