माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांची चावडी वाचनाची मागणी मान्य
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर विधानसभा मतदार संघातील बोगस मतदार अर्ज नोंदणीची चौकशी करुन कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली.
तुळजापूर विधानसभा मतदारसंघात अनेक गावामध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या तक्रारी येत आहेत. वृत्तपत्र, सोशल मिडिया व अन्य माध्यमातून अनेक गावात बोगस मतदार अर्ज नोंदणी झाल्याच्या बातम्या प्रसिध्द होत आहेत. त्यानुसार तातडीने बुथ निहाय नवीन मतदार यादीचे चावडी वाचन करुन बोगस मतदाराची चौकशी करुन संबंधीतावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली होती. ती मागणी जिल्हाधिकारी यांनी मान्य करीत धाराशिव जिल्ह्यातील सर्व 4 विधानसभा मतदार संघात मतदार यादीचे चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत.