धाराशिव – समय सारथी
लोकसभा निवडणुकीत निष्काळजीपणा करुन गैरहजर राहिल्या प्रकरणी 2 जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निवडणुकीसाठी उभे करण्यात आलेल्या खानापूर येथील चेक पोस्टमध्ये विनापरवानगी गैरहजर राहिल्याचे प्रकरणी 2 जणांचे निलंबन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे. तुळजापूर तालुका कृषी कार्यालय येथील वरिष्ठ लिपीक एस एस सोलनकर व पंचायत समिती तुळजापूर येथील ग्रामसेवक डी डी कांबळे यांचे निलंबन केले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या मतदान प्रक्रिया प्रशिक्षण शिबिरास गैरहजर राहणाऱ्या 447 अधिकारी व कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बजावली असुन त्यानंतर निवडणूक आयोगाच्या आदेशाने कारवाई केली जाणार आहे.