धाराशिव – समय सारथी
कै पवनराजे निंबाळकर व चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांडाचा खुलासा एका पत्राने केला, हत्याकांड 3 जुन 2006 ला झाले असले तरी ते उघड व्हायला व संशयित आरोपीची नावे समोर यायला तब्बल 3 वर्षांचा कालावधी लागला, यात अनेक घडामोडी घडल्या. गेली 14 वर्षापासून सुरु असलेल्या हत्याकांडाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली असुन 30 ऑक्टोबरपर्यंत निकाल द्यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत, पुढील. सुनावणी 9 सप्टेंबर रोजी होणार आहे.
हत्याकांडातील माफीचा साक्षीदार बनलेल्या पारसमल जैन बादला याची मुलगी वर्षा हिने वडिलांनी सांगितलेल्या हत्याकांडाची माहिती 7 आरोपीच्या नावासह सीबीआयला दिली आणि त्यानंतर पारसमल जैन व शुटर दिनेश तिवारी यांच्या कोर्टातील जबाबानंतर रक्तरंजित हत्याकांड उघड झाले, ज्यात राज्याचे माजी गृहमंत्री डॉ पद्मसिंह पाटील यांच्यासह 9 जणांना अटक करण्यात आले. विद्यमान खासदार व एका राज्याचे माजी गृहमंत्री पाटील यांना अटक झाल्याने हे प्रकरण देशभर चर्चेले गेले.
पारसमल जैन व दिनेश याने कोर्टात 29 व 30 मे 2009 रोजी दिलेल्या 164 जबाबात अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. जैन याला पोलिसांनी दुसऱ्या गुन्ह्यात अटक केल्यानंतर तो आर्थर रोड जेल मध्ये होता त्याला आर्म ऍक्ट त्यानंतर दरोडा व त्यानंतर चोरी अश्या 3 गुन्ह्यात पोलिसांनी टप्याटप्याने अटक केली. त्यानंतर त्याने मुलगी वर्षा हिला सांगितले की, मी हे 3 गुन्हे केले नसून मला अडकवण्यात आले असुन मी एकच गुन्हा केला आहे, तो म्हणजे पवनराजे निंबाळकर याची हत्या… मला पोलिस वारंवार एकामागून एक गुन्ह्यात अडकवत असुन जीविताला धोका आहे. तु सीबीआयला पत्र लिहून त्यात हे सगळे सांग. त्यानुसार वर्षाने 27 एप्रिल 2009 रोजी 2 पानाचे पत्र लिहले त्यात तिने हत्याकांडाची माहिती, आरोपीची नावे त्यांचा हत्याकांडातील सहभाग याची माहिती दिली.
वर्षाच्या पत्रानंतर सीबीआयने तपासाला सुरुवात करीत ते पत्र राज्याच्या पोलिस महासंचालकाकडे पाठवले व 25 मे रोजी पवनराजे हत्याकांडात पारसमल जैन व दिनेश तिवारी या 2 जणांना अटक केली त्यानंतर 31 मे रोजी सतीश मंदाडे व मोहन शुक्ला, 6 जुन 2009 रोजी पद्मसिंह पाटील यांना सीबीआयने मुंबई येथील अटक केली. कदाचित वर्षाने ते पत्र सीबीआयपर्यंत पोहचले नसते किंवा त्याची योग्य ती कायदेशीर दखल घेतली नसती तर चित्र वेगळेच राहिले असते.
पारसमल जैन याने 29 मे 2009 रोजी न्यायाधीश श्रीमती एस बी महाले यांच्या कोर्टात 164 अंतर्गत जबाब दिला, त्यानुसार माजी गृहमंत्री पदमसिंह पाटील यांनी सतीश मंदाडे मार्फत पवनराजे व समाजसेवक अण्णा हजारे यांची हत्या करण्यासाठी सुपारी दिली. 17 महिने कट शिजवून पवनराजे यांचे लातूर, गोवर्धनवाडी येथील घर, धाराशिव येथील कार्यालय येत रेकी केल्यानंतर निंबाळकर व काझी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
माझी आर्थिक स्तिथी बिकट असल्याने स्तिथी मी माझा मित्र मोहन शुक्ला यांना सांगितली. जानेवारी 2005 मध्ये मी शुक्ला याच्या घरी गेलो त्यावेळी त्याने मला 50 हजार रुपयांची मदत केली व म्हणाला पारस कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है. तू एक काम कर मेरे मित्र सतीश मंदाडे के पास लातूर जाकर उनसे मिल. उनका एक काम है, डॉ पदमसिंह पाटील पवनराजे निंबाळकर से परेशान है.उनकी हत्या का काम तू कर दे तो तुझे अच्छा खासा पैसा मिल जायेगा.मंदाडेने बताया डॉक्टर पदमसिंह पाटील साखर घोटाले के कारण बहोत परेशान है. इसलिये पहले पवनराजे का खून करने का उसके बादमे अण्णा हजारे का खून का काम भी तुम्हे दे देंगे.तो मैने उनको कहा कि मै पवनराजे साहब का काम कर दूंगा लेकिन अण्णा हजारे का काम नहीं कर पाऊंगा.तो मंदाडे ने काही ठीक है पवनराजे का करो. तो मैने पवनराजे को मारा.