धाराशिव – समय सारथी
आर्थिक देवाण घेवाणीतुन एकाला अमानुष मारहाण करण्यात आली असुन त्यात मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. धाराशिव तालुक्यातील केशेगाव येथील 55 वर्षीय मधुकर चंदर कोळगे असे मयत व्यक्तीचे नाव असुन त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप नातेवाईक यांनी केला असुन आरोपीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. 60 हजार रुपये आर्थिक देण्याच्या बदल्यात कोळगे यांना एका व्यक्तीने गेल्या 7 ते 8 महिन्यापासुन शेतात डांबून ठेवले होते, व्याजाने रक्कम वसुल करुनही पैसे वसुल करण्यासाठी शेतात मजुरी काम करुन घेतले जात होते असा आरोप त्यांचा मुलगा मारुती यांनी केला आहे. कोळगे यांच्या संपुर्ण अंगावर मारहानीचे वण असुन अंग काळे निळे पडले आहे. त्यांना मारहाण करुन एकाने रुग्णालयात आणुन टाकले व मुलाला फोन केला,की तुमचे वडील गंभीर आजारी आहेत. या घटनेत गुन्हा नोंद करुन कारवाई करावी अशी मागणी केली आहे. धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयात गावकरी जमले आहेत.