धाराशिव – समय सारथी
शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बद्दल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धाराशिवमध्ये मोठे वक्तव्य केला आहे शेतकरी कर्जमाफीसाठी नेमण्यात आलेल्या समितीचा अहवाल येताच कर्जमुक्तची घोषणा केली जाईल अशी माहिती बावनकुळे यांनी दिली आहे. प्रहारचे बच्चू कडू व इतर शेतकरी संघटना सध्या राज्यात कर्जमुक्ती वरून आंदोलन पेटवत आहेत. यावेळी सरकारला कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न विचारला जातो त्याला बावनकुळे यांनी धाराशिवमध्ये उत्तर दिले, यावेळी आमदार राणाजगजीतसिंह पाटील उपस्थितीत होते.
महायुतीमध्ये कोणताही गोंधळ नाही येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्रित लढणार असा पुनरुच्चार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरेंना मोदी यांचे विकास काम दिसत नाही. त्यांच्या चष्म्याचा नंबर बदलावा लागेल किंवा एखाद्या चांगल्या डोळ्याच्या दवाखान्यात दाखवाव लागेल. संपूर्ण जगाने मोदीच्या भूमिकेला मान्यता दिली, हे उद्धव ठाकरे यांना दिसत नाही. असे शब्दात महसूल मंत्री बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय . नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचा पक्ष रसा तळाला गेलाय याकडे लक्ष द्यावे असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
आज दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. मोदी जगभर फिरतात मात्र आपला जगात एकही मित्र नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. या टीकेला आज चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिला. बावनकुळे दोन दिवसाच्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत.