राजनैतिक महत्वकांक्षा नसुन राजा बनविन्याची महाभारी हौस – आमदार खासदार झालो तर आगलावे धंदे कोण करायचे
धाराशिव – समय सारथी
राम मंदीर तो झांकी है, काशी मथुरा बाकी है, राम मंदीर ही एक उपलब्धी आहे, त्यांनी 5 लाख मंदिरे फोडली त्यामुळे 5 लाख मंदीर बाकी आहेत ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न करू असे म्हणत कालीपुत्र कालीचरण महाराज यांनी सर्व वादग्रस्त मंदीर ताब्यात घेण्याचा संकल्प केला. राम मंदीर राजाने ताब्यात दिले, कलम 370 राजाने हटाविले, साधू संतांनी राम मंदीर हातात दिले काय ? साधू संतांनी धर्म प्रचार केला व जागृती केली पण हे काम फक्त सत्तेत बसलेला राजाच करू शकतो.
मला कोणतीही राजनैतिक महत्वकांक्षा नाही व हौस नाही, मला राजा म्हणजे खासदार आमदार व्हायचे नाही तर मला राजा बनविन्याची महाभारी हौस आहे. मी आमदार खासदार बनून बसलो तर बाकीचे धर्माची कामे, आगलावे धंदे कोण करायचे असे सांगत कालीचरण महाराज यांनी निवडणुका लढविणार नसल्याची भुमिका स्पष्ट केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराजाधी अधिराज असुन खासदार व आमदार हे राजा आहेत.
सर्वच राजकीय पक्ष मुस्लिम लोकांना व्होट बँक म्हणून पाहते, हिंदू व्होट बँक नाही. हिंदू सडक्या जातीयवादात विभागला गेलेला असुन जातीयवाद, वर्णवाद, भाषा, प्रांतवाद संपवुन हिंदूंना हिंदूंच्या हिताची व्होट बँक घडविले हे आपल्या धाराशिवसह राज्यव्यापी दौऱ्याचे उदिष्ट व कर्तव्य आहे. मुस्लिम लोकांनी फोडलेली 5 लाख मंदिरे जर परत हवी असतील तर राजनीतीचे हिंदूकरण करणे गरजेचे आहे.
गोवंश हत्याबंदी, लव्ह जिहाद, वकफ बोर्ड बरखास्त झाले पहिजे, समान नागरी कायदा लागु झाला पहिले त्याच बरोबर संपूर्ण प्रजा कट्टर हिंदुत्ववादी झाली पाहिजे.व्होट बँकेचा धाक निर्माण झाला तरच राजा मागण्या मान्य करेल. सध्या तरी भाजप व शिंदे यांची शिवसेना हिंदुत्वला पोषक आहे. अफ़वा तर काहीही उठतात मात्र खासदारकी निवडणुक लढवायला दम तरी लागतो त्यामुळे मी निवडणुक लढविणार नाही, कट्टर हिंदुत्ववादी व हिंदुत्वाची जाण असलेल्या लोकांनी राजकारणात आले पाहिजे असे कालीचरण यांनी सांगितले.
आमदार खासदार अर्थात राजा हे मुस्लिम लोकांना झेलतात, त्याच्या इच्छा पुर्ण करण्याच्या मागे लागलेले असतात कारण ती व्होट बँक आहे. हिंदूंचे 100 टक्के व्होटिंग हिंदुत्वसाठी झाले तर हिंदुही झेलला जाईल.हिंदू राजनीतीची गृणा करतो, 60 टक्के हिंदू मतदान करीत नाहीत असे ते म्हणाले.